आयर्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामन्यात खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडीजच्या मॅथ्यू फोर्डने खास विक्रमाला गवसणी घातली. त्याने एकदिवसीय सामन्यात सर्वांत जलद अर्धशतक झळकावून एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यानंतर संपूर्ण क्रिकेटविश्वात फोर्डच्या आक्रमक खेळीची चर्चा रंगली आहे.
आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मॅथ्यू फोर्डने खळबळ उडवून दिली. मॅथ्यू फोर्डने फक्त १६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या कामगिरीसह त्याने एबी डिव्हिलियर्सच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. दरम्यान, २०१५ मध्ये डिव्हिलियर्सने वेस्ट इंडिजविरुद्ध १६ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी जमली नाही. परंतु, मॅथ्यू फोर्डने हा चमत्कार करून दाखवला. फोर्डने दोन चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने फक्त १६ चेंडूत अर्धशतक झळकावले.
एकदिवसीय सामन्यातील सर्वात जलद अर्धशतक१) एबी डिव्हिलियर्स (वेस्ट इंडीज विरुद्ध): १६ चेंडू २) मॅथ्यू फोर्ड (आयर्लंड विरुद्ध): १६ चेंडू३) सनथ जयसूर्या (पाकिस्तान विरुद्ध): १७ चेंडू४) कुसल परेरा (पाकिस्तान विरुद्ध): १७ चेंडू५) मार्टिन गुप्टिल (श्रीलंका विरुद्ध): १७ चेंडू