IRE vs IND, 2nd T20I : भारत-आयर्लंड दुसऱ्या सामन्यावर 'संकट'; हार्दिक पांड्याच्या निर्भेळ यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा

IRE vs IND, 2nd T20I : हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली आयर्लंड येथे दाखल झालेल्या भारतीय संघाने पहिली ट्वेंटी-२० लढत सहज जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 04:55 PM2022-06-28T16:55:07+5:302022-06-28T16:56:14+5:30

whatsapp join usJoin us
IRE vs IND, 2nd T20I Weather Report: RAIN expected to play spoilsport ONCE AGAIN, partial showers predicted in DUBLIN   | IRE vs IND, 2nd T20I : भारत-आयर्लंड दुसऱ्या सामन्यावर 'संकट'; हार्दिक पांड्याच्या निर्भेळ यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा

IRE vs IND, 2nd T20I : भारत-आयर्लंड दुसऱ्या सामन्यावर 'संकट'; हार्दिक पांड्याच्या निर्भेळ यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IRE vs IND, 2nd T20I : हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली आयर्लंड येथे दाखल झालेल्या भारतीय संघाने पहिली ट्वेंटी-२० लढत सहज जिंकली. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला सामना १२-१२ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजता सुरू होणाऱ्या लढतीला पावसामुळे ११.२० वाजले. पावसाने जवळपास दोन-अडीच तास बॅटिंग केली. आता दुसऱ्या सामन्यावरही पावसाचे संकट आहे. डबलिन येथे होणाऱ्या या लढतीचे सर्व तिकिटं विकली गेली आहेत, परंतु चाहत्यांच्या आनंदावर पाऊस पाणी फिरवण्याच्या तयारीत आहे.   

पहिल्या ट्वेंटी-२०त हॅरी टेक्टरच्या ३३ चेंडूंतील ६४ धावांच्या जोरावर आयर्लंडने १०८ धावांपर्यंत मजल मारली. भुवी, हार्दिक, आवेश व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात भारताच्या इशान किशनने ११ चेंडूंत २६ धावा केल्या. सूर्यकुमार यादव गोल्डन डकवर बाद झाला. हार्दिकनेही १२ चेंडूंत २४ धावा केल्या. दीपक २९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ४७ धावांवर नाबाद राहिला. ऋतुराजच्या पोटरीत दुखापत झाल्यामुळे तो फलंदाजीला आला नाही, असे हार्दिकने सामन्यानंतर सांगितले.  

आजच्या सामन्यात ऋतुराजच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण, पाऊस पुन्हा खेळखंडोबा करू शकतो. हवामानाच्या अंदाजानुसार तुरळक सरी पडू शकतात. आयर्लंडमध्ये या कालावधीत उष्णता असते, परंतु यंदा अनपेक्षितरित्या पाऊस पडतोय.   

Web Title: IRE vs IND, 2nd T20I Weather Report: RAIN expected to play spoilsport ONCE AGAIN, partial showers predicted in DUBLIN  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.