Join us  

Deepak Hooda, IRE vs IND, 2nd T20I : दीपक हुडाचे शतक, Sanju Samson सह केली ट्वेंटी-२०त विक्रमी भागीदारी; चौकार-षटकारांची आतषबाजी 

 IRE vs IND, 2nd T20I : भारताने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात आयर्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 10:23 PM

Open in App

 IRE vs IND, 2nd T20I : भारताने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात आयर्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दीपक हुडा ( Deepak Hooda) व संजू सॅमसन ( Sanju Samson) यांनी १७६ धावांची भागीदारी करताना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील स्वतःच्या सर्वोत्तम खेळीचीही नोंद केली. भारताकडून ही ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदारी ठरली. दीपक हुडाने ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावले. दीपकने ५५ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केल. रोहित शर्मा, लोकेश राहुल, सुरेश रैना यांच्यानंतर दीपकने ट्वेंटी-२०त शतक झळकावले. हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऋतुराज गायकवाडच्या पोटरीला दुखापत झाल्याने तो या सामन्याला मुकला आहे आणि त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी दिली गेली आहे. हर्षल पटेल व रवी बिश्नोई यांना संघात स्थान मिळाले असून आवेश खान व युजवेंद्र चहल यांना विश्रांती दिली गेली आहे. हार्दिकने संजूचे नाव घेताच स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला आणि हे पाहून हार्दिकही थक्क झाला.. संजूच्या बॅटीतून पहिल्याच चेंडूवर चौकार आला. पण, आज इशान किशन ( ३) अपयशी ठरला, तिसऱ्या षटकात मार्क अडेरने त्याला बाद केले. त्यानंतर आलेल्या दीपक हुडाने अडेरच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार खेचला.     मागच्या सामन्यातील मॅच विनर दीपक आज आक्रमक फॉर्मात दिसला.. त्याने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि संजूनेही पहिले अर्धशतक झळकावताना दीपकसह शतकी भागीदारीही पूर्ण केली. या दोघांना आयर्लंडच्या खेळाडूंकडून जीवदानही मिळाले. दीपकची फटकेबाजी सुरू असताना संजूने बचावात्मक पवित्राच घेतला होता. पण, १४व्या षटकानंतर संजूनेही गिअर बदलला. गॅरेथ डेनलीच्या ४ षटकांत या दोघांनी ४३ धावा चोपल्या. संजू ४२ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांवर बाद झाला. त्याने दीपकह ८७ चेंडूंत १७६ धावांची भागीदारी केली आणि ही ट्वेंटी-२०तील भारताकडून सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी लोकेश राहुल व शिखर धवन यांच्या १६५ धावांचा (  vs Sri Lanka at Indore in 2017)  विक्रम होता.   

टॅग्स :भारतआयर्लंड
Open in App