Join us  

इराणी करंडक: विहारीने सावरला शेष भारताचा डाव

उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या हनुमा विहारीच्या लागोपाठ दुसऱ्या शतकाच्या बळावर इराणी करंडकाच्या सामन्यात शेष भारताने रणजी चॅम्पियन विदर्भाला शुक्रवारी विजयासाठी २८० धावांचे लक्ष्य दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 2:33 AM

Open in App

नागपूर : उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या हनुमा विहारीच्या लागोपाठ दुसऱ्या शतकाच्या बळावर इराणी करंडकाच्या सामन्यात शेष भारताने रणजी चॅम्पियन विदर्भाला शुक्रवारी विजयासाठी २८० धावांचे लक्ष्य दिले. जामठा स्टेडियमवर चौथ्या दिवशी दुसºया डावाच्या सुरुवातीलाच लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा कर्णधार फैज फझल शून्यावर बाद झाल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली आहे.खेळ संपला त्यावेळी विदर्भाची एक बाद ३७ अशी स्थिती होती. विदर्भ अद्याप विजयापासून२४३ धावांनी दूर आहे. शेष भारताने दुसरा डाव ३ बाद ३७४ धावांवर घोषित केला. चौथ्या दिवसाचा खेळ गाजवला तो विहारीने. २५ वर्षांच्या या खेळाडूने ३०० चेंडू टोलवून १९ चौकार आणि चार षट्कारांसह नाबाद १८० धावा ठोकल्या. शिवाय कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत (८७ धावा) तिसºया गड्यासाठी २२९ धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यरसोबतही (६१ धावा) विहारीने चौथ्या गड्यासाठी ९९ धावा कुटल्या.विदर्भाच्या दुसºया डावाची सुरुवात खराब झाली. तिसºयाच चेंडूवर कर्णधार फैजची वेगवान अंकित राजपूतने शून्यावर दांडी गुल केली. खेळ थांबला त्यावेळी संजय रामास्वामी १७ आणि अथर्व तायडे१६ धावांवर नाबाद होते.पहिल्या डावात ११४ धावा ठोकून शेष भारताच्या धावसंख्येला आकार देणाºया विहारीने फॉर्म कायम राखला. विहारी-रहाणे यांनी कालच्या २ बाद १०२ वरून दुसºया डावाला पुढे सुरुवात केली. या दोघांच्या भागीदारीमुळे सामन्याचे चित्र बदलून गेले. दोघांनी विदर्भाच्या गोलंदाजांना त्रास देत पहिल्या सत्रात ११० धावा ठोकल्या. सुरुवातीला गोलंदाजांना सन्मान देणाºया दोन्ही फलंदाजांनी नंतर मनसोक्त धावा काढल्या.विहारीने अक्षय वखरेच्या चेंडूवर धाव घेत १७ वे प्रथमश्रेणी शतक गाठले. इराणी करंडकाच्या दोन्ही डावांत शतके करणारा विहारी हा दुसरा फलंदाज बनला. याआधी शिखर धवन याने शेष भारताकडून राजस्थानविरुद्ध २०११ मध्ये दोन्ही डावांत शतके झळकवलीहोती.विदर्भाने ९३ व्या षटकांत नवा चेंडू घेतला. यानंतर लगेच यश मिळाले. सरवटेचा चेंडू पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात यष्टिरक्षक अक्षय वाडकर याने रहाणेच्या यष्ट्या उडविल्या. रहाणेने २३२ चेंडू खेळून सहा चौकार आणि एक षट्कार मारला. आॅगस्ट २०१७ पासून प्रथम श्रेणीतील ३८ धावांमध्ये रहाणेचीही सर्वोच्च खेळी ठरली.मैदानात घुसला मुलगाअजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी हे धडाकेबाज फलंदाजी करीत असताना एक मुलगा जामठा मैदानाचे सुरक्षा कठडे तोडून चक्क मैदानात शिरला. तो खेळपट्टीकडे येत असताना पाहताच विदर्भाचा कर्णधार फैज फझलने रोखले. हा मुलगा प्रेक्षागॅलरीकडे परत तर गेला, पण सुरक्षारक्षकांनी त्याला शोधून काढत मैदानाबाहेर घालविले. या मैदानात प्रेक्षक शिरण्याची ही पहिलीच वेळ ठरली.हुतात्म्यांना श्रद्धांजलीपुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या सीआरपीएफ जवानांना इराणी करंडकादरम्यान विदर्भ आणि शेष भारताच्या खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली. चौथ्या दिवशी मैदानावर उभय संघातील खेळाडूंनी दंडावर काळ्या फिती लावून दहशतवादी कृत्याचा निषेध केला. गुरुवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान मृत्युमुखी पडले होते.पंच नंदन दुखापतग्रस्तचौथ्या दिवशी ९५ व्या षटकांत विदर्भाचा क्षेत्ररक्षक अथर्व तायडे यांने लाँग आॅफवर डाव्या हाताने फेकलेला चेंडू थेट पंच नंदन यांच्या डोक्यावर आदळला. ते खाली बसताच उभय संघातील खेळाडूंनी त्यांच्या सभोवताल गराडा घातला. फिजिओदेखील धावून गेले. सामनाधिकारी मनू नय्यर यांनी देखील मैदानावर धाव घेत नंदन यांची विचारपूस केली. नंदन यांनी आपण सुरक्षित असल्याचे सांगताच खेळ पूर्ववत सुरू झाला.आम्ही कठीण परिस्थितीतून मार्ग काढून विजयाची शक्यता निर्माण केली आहे. विजयासाठी अखेरच्या दिवशी सर्वंकष प्रयत्न करू. कृष्णप्पा गौतम शेवटच्या दिवशी गोलंदाजी करेल असे वाटत नाही. या खेळपट्टीवर त्याची गरज असताना तो जायबंदी झाला. तथापि, सामना फिरविणारे आणखी दोन दर्जेदार स्पिनर संघात आहेत. या खेळपट्टीवर धावा निघणे कठीण झाले आहे. मी बचावात्मक पवित्रा घेतला. शिवाय खराब चेंडूवर धावा काढल्या. दुसºया डावात धावा काढण्यासाठी ही खेळपट्टी एकूणच आव्हानात्मक ठरली.- हनुमा विहारी,शेष भारत.धावफलकशेष भारत (प. डाव) : ३३०. विदर्भ (प. डाव) : ४४५शेष भारत दुसरा डाव : मयंक अगरवाल झे. काळे गो. वखरे २७, अनमोलप्रितसिंग झे. वखरे गो. सरवटे ६, हनुमा विहारी नाबाद १८०, अजिंक्य रहाणे यष्टिचित अक्षय वाडकर गो. आदित्य सरवटे ८७, श्रेयस अय्यर नाबाद ६१, अवांतर १३, एकूण : १०७ षटकात ३ बाद ३७४.गडी बाद क्रम : १/२५, २/४६, ३/२७५. गोलंदाजी : आदित्य सरवटे ३९-७-१४१-२, रजनीश गुरबानी ८-१-३६-०, अक्षय वखरे १८-२-६०-१, अक्षय कर्णेवार २६-७-६२-०, यश ठाकूर ६-१-३३-०, संजय रामास्वामी १-०-८-०, अथर्व तायडे ९-१-२४-०.विदर्भ (दु. डाव) : फैज फझल त्रि. गो. अंकित राजपूत ००, संजय रामास्वामी खेळत आहे १७, अथर्व तायडे खेळत आहे १६, अवांतर : ४, एकूण: १६ षटकात १ बाद ३७. गोलंदाजी : अंकित राजपूत४-०-१०-१, तन्वीर उल हक २-०-९-०, धर्मेंद्रसिंग जडेजा ६-१-१३-०, राहुल चहर ४-३-१-०.

टॅग्स :नागपूर