इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामातील पहिल्या २० सामन्यांचे वेळापत्रक समोर आले आहे. २८ मार्च पासून यंदा आयपीएलचा बिगूल वाजणार आहे. पण या हंगामात IPL फ्रँचायझीसाठी एक मोठे आव्हान असेल. मध्य पूर्वेत अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विमान सेवेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे परदेशी खेळाडू वेळेत संघात पोहचतील का? यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! परदेशी खेळाडूंना वेळेत भारतात आणण्याचे आव्हान
आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची सांगता झाल्यावर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंना मायदेशी पाठवण्यासाठी ICC ला मोठी कसरत करावी लागली होती. चार्टड प्लेनचा प्लॅन कोलमडल्यावर आयसीसीने खेळाडूंना वेगवेगळ्या कमर्शियल फ्लाइटनं मायदेशी पाठवल्याचेही समोर आले होते. याउलट आता IPL फ्रँचायझींना आपल्या ताफ्यातील परदेशी खेळाडूंना वेळेत भारतात आणण्यासाठी धडपड करावी लागू शकते. याशिवाय मध्य पूर्वेतील संघर्षामुळे विमान भाड्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्याचाही फटका IPL फ्रँचायझी संघांना बसेल.
IPL 2026 Schedule : ठरलं! २८ मार्चपासून रंगणार IPL चा थरार; RCB विरुद्ध SRH यांच्यात सलामीची लढत
खेळाडूंच्या रहाण्या खाण्याचा खर्चही महागणार
मध्य पूर्वेतील संघर्षाचा परिणाम भारतातही दिसू लागला आहे. देशातील अनेक हॉटेल्समध्ये एलपीजी (LPG) गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसचा अखंड पुरवठा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक वस्तू अधिनियम (Essential Commodities Act) लागू केला आहे. त्यामुळे खेळाडूंच्या राहण्या खाण्याचा खर्चावरही याचा परिणाम होऊ शकतो.
CSK च्या ताफ्यातील वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू वेळेत भारतात येणार?
चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी आपल्या ताफ्यातील दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे खेळाडू स्पर्धेतील पहिल्या सामन्याआधी संघात सामील होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. आता त्यासाठी चेन्नई काय ट्रॅव्हलिंग प्लॅन आखणार ते मात्र गुलदस्त्यातच आहे.
पहिल्या टप्प्यात १० मैदानावर खेळवण्यात येणार २० सामने
बीसीसीआयने जाहीर केलेल्या सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार यंदाच्या हंगामातील पहिल्या टप्प्यातील २० सामने १० वेगवेगळ्या मैदानांवर खेळवले जाणार आहेत. यात बंगळुरु, मुंबई. गुवाहटी, चंदीगड, लखनौ, कोलकाता. चेन्नई, दिल्ली अहमदाबाद आणि हैदराबादच्या स्टेडियमचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील २० सामने ४ डबल हेडरसह १६ दिवसांत खेळवण्यात येणार आहेत.
Web Summary : The Middle East conflict could delay foreign players' arrival for IPL 2026, increasing airfares and affecting player accommodation costs due to potential LPG shortages. CSK remains optimistic about player arrival. The initial schedule includes 20 matches across 10 venues.
Web Summary : मध्य पूर्व संघर्ष से IPL 2026 के लिए विदेशी खिलाड़ियों के आगमन में देरी हो सकती है, हवाई किराए बढ़ सकते हैं और LPG की कमी के कारण खिलाड़ियों के आवास लागत प्रभावित हो सकती है। CSK को खिलाड़ियों के आगमन की उम्मीद है। शुरुआती कार्यक्रम में 10 स्थानों पर 20 मैच शामिल हैं।