Join us

इक्बाल अब्दुल्लाने 7 षटकात 4 धावा, 4 मेडन, 3 विकेट्स घेत मणिपूरची उडवली दाणादाण

विजय हजारे चषक स्पर्धेत सिक्कीम आणि मणिपूरचा सामना  शनिवारी रंगला होता. या सामन्यात सिक्कीम संघाकडून खेळताना इक्बाल अब्दुल्लाने अप्रतिम गोलंदाजी करत मणिपूरची दाणादाण उडवून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 11:03 IST

Open in App

मुंबई: विजय हजारे चषक स्पर्धेत सिक्कीम आणि मणिपूरचा सामना  शनिवारी रंगला होता. या सामन्यात सिक्कीम संघाकडून खेळताना इक्बाल अब्दुल्लाने अप्रतिम गोलंदाजी करत मणिपूरची दाणादाण उडवून दिली.

सिक्कीम आणि मणिपूरमध्ये रंगणाऱ्या सामना  पावसामुळे 40 षटकांचा खेळविण्याचा निर्णय पंचांनी घेतला होता. या सामन्यात मणिपूरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सिक्कीमच्या भेदक गोलंदाजीसमोर मणिपूरचा संघ 120 धावातच गुंडळला. यावेळी सिक्कीम संघाकडून खेळणार डावखुरा फिरकीपटू इक्बाल अब्दुल्लाने सात षटकात अवघ्या 4 धावा देत चार मेडन टाकत 3 विकेट्स घेत मणिपूर संघाची दाणादाण उडवून दिली. यानंतर इक्बालने या कामगिरीचे श्रेय अल्‍लाह देत ट्विट केले आहे. तसेच यशपाल सिंगने देखील 6.4 षटकात 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.

तसेच सिक्कीम संघ धावांचा पाठलाग करताना मणिपूरच्या राजकुमार रेक्स सिंगच्या पहिल्या षटकातचं एकही न धावा करता 2 विकेट्स गमवल्याने सामन्यात रंगत आली होती. मात्र पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेवटी पंचाना हा सामना रद्द करावा लागला. राजकुमार रेक्स सिंगने पहिल्या षटकात एकही धावा न देता दोन विकेट्स घेतल्या. या आधी देखील रेक्स सिंगने एका डावात 10 विकेट्स घेण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे.  

टॅग्स :सिक्किम