Join us

CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ

धावांचा पाठलाग करताना प्रभसिमरनच्या अर्धशतकी खेळीशिवाय श्रेयस अय्यरनंही दमदार अर्धशतक झळकावले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 00:10 IST

Open in App

IPL 2025 PBKS Knock CSK  First Team Out Of The Playoffs Race :  महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदाच्या हंगामातून आउट होणारा पहिला संघ ठरला आहे. चेपॉकच्या घरच्या मैदानात पंजाब किंग्जनंही CSK चा धुव्वा उडवला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्जच्या संघावर सलग दोन हंगामात प्लेऑफ्स आधीच गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे. चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात सॅम कुरेन याने केलेल्या ८८ धावांच्या खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने यावेळी फलंदाजीत धमक दाखवली. पण १९ व्या षटकात चहलनं घेतलेल्या हॅटट्रिकनं सॅम कुरेनच्या दमदार खेळीवर पाणी फेरले. ही लढाई चेन्नईचा संघ २०० पारची करेल, असे वाटत होते. पण चेन्नईच्या संघाला पंजाब किंग्ज विरुद्ध निर्धारित २० षटकेही खेळता आली नाहीत. परिणामी संघ १९० धावांत ऑलआउट झाला. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर प्रभसिमरनच्या अर्धशतकी खेळीशिवाय श्रेयस अय्यरनंही दमदार अर्धशतक झळकावले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

बॅटिंगमध्ये सॅम कुरेन अन् डेवॉल्ड ब्रेविस वगळता सारे फेल

पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जकडून शेख राशीद आणि आयुष म्हात्रे या दोन युवा बॅटर्संनी संघाच्या डावाची सुरुवात केली. शेख राशी १२ चेंडूत ११ धावा करून तंबूत परतला. आयुष म्हात्रेची इनिंगही ६ चेंडूत ७ धावांवर धांबली. संघ अडचणीत असताना तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या सॅम कुरेन याने ४७ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८८ धावांची दमदार खेळी करत चेन्नई सुपर किंग्जला मजबूत स्थितीत आणले. त्याच्याशिवाय डेवॉल्ड ब्रेविस याने २६ चेंडूत ३२ धावा केल्या. या दोघांशिवाय अन्य कुणालाही बॅटिंगमध्ये धमक दाखवता आली नाही. परिणामी चेन्नईचा डाव १९.२ षटकात १९० धावांवरटच आटोपला.

प्रभसिमरन अन् श्रेयस अय्यर जोडी जमली

चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात १९१ धावसंख्या ही आव्हानात्मक होती. पण प्रियांश आर्य २३ धावांवर तंबूत परतल्यावर प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचत चेन्नईच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. प्रभसिमरन सिंग याने ३६ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ५४ धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यनंर ४१ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ७२ धावा करत संघाला विजयाच्या जवळ नेले. अखेरच्या षटकात शशांक सिंग याने १२ चेंडूत २३  धावा केल्या. अखेरच्या षटकात मार्को यान्सेन याने चौकार मारला अन् पंजाबने ४ विकेट्स राखून सामना जिंकला.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५चेन्नई सुपर किंग्सपंजाब किंग्स