Join us  

IPL2020 : यंदाच्या आयपीएलमध्ये 'या' खेळाडूंनी खेळू नये, कपिल देव यांचा सल्ला

कपिल देव यांनी आपल्या अनुभवानुसार क्रिकेटपटूंना सल्ले दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 5:23 PM

Open in App

आयपीएलचा यंदाचा मोसम रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. कारण काही दिग्गज खेळाडूंसाठी यंदाचे आयपीएल शेवटचे ठरू शकते, असे म्हटले जात आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू नका, असा सल्ला भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी दिला आहे.

आयपीएलमध्ये धोनीनं चांगली कामगिरी केल्यास त्याचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. धोनीला सेंट्रल करार न देऊन बीसीसीआयनं जेवढे सामने खेळाल, तेवढंच मानधन मिळेल असे संकेत दिले आहेत. धोनीने आता आयपीएलवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे धोनीने आयपीएलच्या सरावाची तारीखही ठरवली आहे.

कपिल देव यांनी आपल्या अनुभवानुसार क्रिकेटपटूंना सल्ले दिले आहेत. देव म्हणाले की, " आयपीएल स्पर्धा ही जवळपास दीड महिना सुरु असते. पण जे खेळाडू आपल्या देशासाठी खेळतात त्यांना सर्वोत्तम फिटनेस राखणे महत्वाचे असते. कारण कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात महत्वाचा देश असायला हवा. देशाकडून खेळाताना तुम्ही फिट असायलाच हवे. देशासाठी खेळण्याला तुम्ही प्राधान्य द्यायला हवे." 

ते पुढे म्हणाले की, " आपण देशासाठी खेळायला हवे, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्यामुळे खेळाडूंनी अन्य कोणत्याही लीगपेक्षा देशाला प्रधान्य द्यायला हवे. जे खेळाडू थकलेले आहेत किंवा जायबंदी आहेत त्यांनी आयपीएलमध्ये खेळू नये. कारण आयपीएल खेळल्यावर त्यांना देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करता येणे अवघड असेल." 

भारतात टी-२० क्रिटेकची आयपीएल ही लीग कमालीची यशस्वी झाली आहे. आयपीएलला मिळालेल्या या यशानंतर अनेक देशांनी टी-२० लीग सुरू केल्या आहेत. भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्ताननेही आयपीएलप्रमाणेच आपली पीएसएल ही लीग सुरू केली आहे. मात्र पीएसएलला यशस्वी ठरवण्यासाठी पाकिस्तानने आयपीएलमधील अनेक कल्पना जशाच्या तशा उचलल्या आहेत.

टॅग्स :आयपीएलकपिल देवआयपीएल 2020