Join us

आयपीएल ठरल्याप्रमाणे होणार!- सौरव गांगुली

तरी स्पर्धेदरम्यान सर्वतोपरी उपाययोजना केली जाईल,’ अशी माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शुक्रवारी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 04:27 IST

Open in App

कोलकाता : ‘आयपीएलचे यंदाचे सत्र निर्धारित वेळापत्रकानुसार होईल. कोरोना व्हायरसची सर्वत्र दहशत असली, तरी स्पर्धेदरम्यान सर्वतोपरी उपाययोजना केली जाईल,’ अशी माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शुक्रवारी दिली.आयपीएलला २९ मार्च रोजी मुंबईत सुरुवात होत आहे. स्पर्धेत भारतासह अनेक आंतरराष्टÑीय देशांचे खेळाडू सहभागी होतील. भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सध्या ३१ असून त्यात इटलीच्या १६ पर्यटकांचा समावेश आहे.आंतरराष्टÑीय पातळीवर या व्हायरसने आतापर्यंत ३३०० बळी घेतले असून जवळपास ८५ देशातील एक लाख लोकांना संक्रमण झाले आहे.वृत्तसंस्थेशी बोलताना गांगुली यांनी आयपीएलचे यंदाचे सत्र वेळापत्रकानुसार निर्धारित तारखांनाच पार पडणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘अनेक ठिकाणी सामने सुरू आहेत. इंग्लंड संघ सध्या श्रीलंकेत आहे. द. आफ्रिका संघ भारतात दाखल झाला आहे. कोरोनाची भीती बाळगण्याचे कारण नाही. कौंटी संघ जगभर प्रवास करीत आहेत. खेळण्यासाठी अनेक खेळाडू यूएई आणि अबुधाबीला जात आहेत. माझ्या मते, कोरोना ही आयोजनातील अडचण नाहीच.’खेळाडू आणि चाहत्यांची सुरक्षा यासाठी काय उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, यावर गांगुली म्हणाले,‘आम्ही सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यास वचनबद्ध आहोत. वैद्यकीय पथकाच्या सूचनेनुसार सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जातील. खेळाडू आणि चाहत्यांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी आमचे वैद्यकीय अधिकारी देशातील अनेक इस्पितळांच्या संपर्कात आहेत. वैद्यकीय अधिकारी व्यावसायिक असल्याने काय उपाय करायचे याची त्यांना चांगली जाणीव आहे. आयपीएल वेळापत्रकातील सर्व सामने ठरल्यावेळी, ठरल्याठिकाणी आणि ठरल्या तारखेलाच होतील, हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो.’ (वृत्तसंस्था)