Join us

IPL: अर्जुन तेंडुलकर करणार का पदार्पण?; सर्व चाहत्यांचे लक्ष लागले

सात सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये अर्जुनच्या सरावावर कोचिंग स्टाफही बारीक लक्ष ठेवून आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 05:50 IST

Open in App

मुंबई : मुंबई इंडियन्सला यंदा एकही विजय मिळवता आला नाही. मुंबईने यंदा अनेक युवा खेळाडूंना संधी दिली. त्यामुळे आता मुंबई सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला संधी देणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 

मुंबईने सराव सत्राचा एक व्हिडिओ शेअर केला. अर्जुनच्या गोलंदाजीवर मुंबईने लिहिले की, ‘अर्जुन लय भारी! तुझी गोलंदाजी शैली आणि फॉलो थ्रू एकदम परफेक्ट आहे.’ सात सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये अर्जुनच्या सरावावर कोचिंग स्टाफही बारीक लक्ष ठेवून आहे. त्यामुळेच पुढील सामन्यात अर्जुनच्या आयपीएल पदार्पणाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरआयपीएल २०२२
Open in App