Join us

आयपीएल: विदेशात विराट, रोहित लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी

द.आफ्रिका, यूएईत विशेष प्रभाव नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 07:13 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सर्वाधिक धावा फटकाविणाऱ्या फलंदाजांमध्ये समावेश आहे, पण ज्यावेळी ही स्पर्धा विदेशात खेळल्या गेली त्यावेळी या दोन्ही फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

कोविड-१९ महामारीमुळे यावेळी आयपीएलचे अयोजन १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे होणार आहे. भारताबाहेर तिसऱ्यांदा ही स्पर्धा होत आहे. यापूर्वी सार्वत्रिक निवडणुकीमुळे २००९ मध्ये स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत तर २०१४ चा पहिला टप्पा यूएईमध्ये खेळल्या गेला होता.

या दोन्ही स्पर्धांमध्ये कोहली व रोहित यांना अपेक्षेनुरुप कामगिरी करता आली नव्हती. कोहलीने आयपीएलमध्ये विदेशात जे २१ सामने खेळले त्यात २३.४० च्या सरासरीने ३५१ धावा केल्या त्यात केवळ सर्वोच्च ५० धावांच्या खेळीचा समावेश आहे. कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण ७७ सामने खेळले त्यात ३७.८४ च्या सरासरीने ५४१२ धावा केल्या आहेत. त्यात ५ शतक व ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. याचा अर्थ कोहलीने भारतात जे १५६ सामने खेळले त्यात त्याने ३९.५३ च्या सरासरीने ५०६१ धावा केल्या आहेत. त्याने पाच शतकांव्यतिरिक्त ३५ अर्धशतक मायदेशात लगावले आहेत. कोहली आयपीएलमध्ये सुरुवातीपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे प्रतिनिधित्व करीत आहे. त्याने २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत १६ सामन्यात २२.३६ च्या सरासरीने एका अर्धशतकी खेळीच्या साहाय्याने २४६ आणि २०१४ मध्ये यूएईत पाच सामन्यात १०५ धावा केल्या. या स्पर्धेत मायदेशात खेळल्या गेलेल्या ९ सामन्यात त्याने दोन अर्धशतकांसह २५४ धावा केल्या होत्या.

रोहितच्या नावावर आयपीएलमध्ये १८८ सामन्यात ३१.६० च्या सरासरीने ४८९८ धावांची नोंद आहे. त्यात एक शतक व ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावणाºया फलंदाजांच्या यादीत कोहली व सुरेश रैना (५३६८) यांच्यानंतर तिसºया क्रमांकावर आहे. रोहितने यातील ४४६ धावा विदेशात फटकावल्या आहेत. त्याने द. आफ्रिका व यूएईमध्ये आतापर्यंत एकूण २१ सामने खेळले आणि २४.७७ च्या सरासरीने धावा केल्या. त्यात दोन अर्धशतकांच्या (सर्वोच्च ५२) समावेश आहे. रोहितने २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सचे प्रतिनिधित्व केले होते.

त्यावेळी त्याने दक्षिण आफ्रिकेत खेळताना १६ सामन्यात एका अर्धशतकाच्या मदतीने ३६२ धावा केल्या होत्या. त्यानंतर पाच वर्षांनी यूएईमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना रोहितला पाच सामन्यांत केवळ ८४ धावा करता अल्या. त्यात चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या ५० धावांच्या खेळीचाही समावेश आहे. त्यामुळे रोहितला उर्वरित चार सामन्यात केवळ ३४ धावा करता आल्या. त्यावेळी मायदेशात खेळल्या गेलेल्या दुसºया टप्प्यात त्याने १० सामन्यात ३०६ धावा करीत आपली कामगिरी सुधारली होती. (वृत्तसंस्था)विदेशात कोहलीची कामगिरी२१ सामने२३.४० सरासरी३५१ धावाएक अर्धशतक(सर्वोच्च ५० धावा)रोहितची एकूण कामगिरी१८८ सामने३१.६० सरासरी४८९८ धावाएक शतक३६ अर्धशतकआईपीएलची एकूण कामगिरी१७७ सामने३७.८४ सरासरी५४१२ धावापाच शतके३६ अर्धशतके

 

टॅग्स :आयपीएलविराट कोहली