Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL: व्हीआयपी ट्रीटमेंटसह बरंच काही; ५० हजारांच्या IPL तिकिटात कुठल्या सुविधा मिळतात? पाहा

IPL ₹50,000 Ticket: सध्या आयपीएलचा फिव्हर जोरात आहे, पण मैदानावरच्या षटकारांपेक्षा सध्या चर्चा रंगतेय ती लखनौच्या एकाना स्टेडियममधील एका 'व्हीआयपी' तिकिटाची! एका तरुणाने ५० हजार रुपयाच्या तिकिटावर सामना पाहिला आणि त्याला मिळालेल्या सुविधा पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 14:32 IST

Open in App

सध्या देशभरात आयपीएलचा रोमांच शिगेला पोहोचला आहे. मैदानावर खेळाडूंच्या बॅटमधून निघणारे षटकार आणि गोलंदाजांच्या कामगिरीची जेवढी चर्चा आहे, तेवढीच चर्चा लखनौच्या एकाना स्टेडियमवर क्रिकेट सामना पाहण्यासासाठी आलेल्या एका तरुणाची होत आहे. या तरुणाने ५०,००० रुपयांचे तिकीट खरेदी केल्यावर प्रेक्षकांना नक्की काय सुविधा मिळतात? यासंदर्भात एक व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @beingsumit01 नावाच्या हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत एक तरुणाने ५० हजार रुपयांच्या प्रीमियम तिकीटाबद्दल आपला अनुभव शेअर केला आहे. त्याने सांगितले की, हे तिकीट खरेदी करणाऱ्या प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये प्रवेश करताच त्यांना पर्सनल असिस्टंट नेमून दिला जातो. हा पर्सनल असिस्टंट प्रेक्षकाला त्यांच्या जागेपर्यंत पोहोचवण्यापासून ते स्टेडियममधील इतर माहिती देण्यापर्यंत सर्व मदत करतो." तो पुढे म्हणतो की, सामान्य आसनव्यवस्थेपेक्षा हे व्हिआयपी लाउंज अत्यंत आरामदायी आणि लक्झरी आहे.

नियमांचे पालन करणे बंधनकारक

शिवाय, खाण्यापिण्याची चंगळ असते. प्रेक्षकांना विविध प्रकारचे पदार्थ आणि स्नॅक्स येथे अनलिमिटेड स्वरूपात उपलब्ध करून दिले जातात. या व्हीआयपी ट्रीटमेंटसह प्रेक्षकांना काही कडक नियमांचे पालनही करावे लागते. जर एखादा प्रेक्षक खेळाडूंना भेटण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव आपला 'VIP झोन' सोडून बाहेर गेला, तर त्याला पुन्हा त्या झोनमध्ये प्रवेश दिला जात नाही. स्टेडियममधील शिस्त आणि सुरक्षा राखण्यासाठी हा नियम अत्यंत काटेकोरपणे पाळला जातो.

सोशल मीडियावर व्हिडिओची चर्चा

हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. काहींनी या सुविधांचे कौतुक केले आहे, तर काहींनी तिकीटाच्या किमतीवरून आश्चर्य व्यक्त केले. आयपीएल ही आता केवळ क्रिकेट स्पर्धा न राहता, ग्लॅमर आणि लक्झरीचे एक मोठे व्यासपीठ बनल्याचे या व्हिडिओतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL's VIP Treatment: Exploring the Perks of a ₹50,000 Ticket

Web Summary : A video reveals the VIP treatment for ₹50,000 IPL ticket holders at Lucknow's stadium. Perks include personal assistants, luxurious lounge access, unlimited food, and strict zone rules. The video sparked online debate about the cost and glamour of IPL.
टॅग्स :आयपीएल २०२६व्हायरल व्हिडिओऑफ द फिल्ड