सध्या सगळीकडेच आयपीएलचा फिव्हर पाहायला मिळतो आहे. आयपीएलला सुरुवात होताच क्रिकेटपटू आणि बॉलिवूड कलाकारांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. दीपिका पादुकोण आणि कॅप्टन कूल धोनी यांच्या डान्सच्या व्हिडिओनंतर आता अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये जॅकलिनसोबत क्रिकेटपटू यजुर्वेंद्र चहलदेखील दिसत आहे.
इंस्टाग्रामवर एका बॉलिवूड फॅन पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत जॅकलिन क्रिकेटपटू चहलला आयपीएलच्या परफॉर्मन्ससाठी डान्सचे धडे दिसत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा फिरकीपटू चहल अभिनेत्री जॅकलिनकडून डान्स स्टेप्स शिकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये जॅकलिन हुला हूपच्या मदतीने चहलला डान्स स्टेप शिकवत आहे. मात्र चहलला ही स्टेप करणे अवघड जात आहे. हुला हूपच्या मदतीने चहलला डान्सचा सराव करताना पाहून जॅकलिनला हसू आवरणे अवघड जात आहे. चहलच्या चेहऱ्यावरील भाव पाहता, त्याला डान्स करणे अवघड जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.