Join us

आयपीएलचा ‘स्ट्राइक रेट’ घसरला, TRP पुन्हा दणक्यात आपटला!

आयपीएल २०२२ चे रेटिंग सलग दुसऱ्या आठवड्यात घसरले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 05:39 IST

Open in App

नवी दिल्ली :

आयपीएल २०२२ चे रेटिंग सलग दुसऱ्या आठवड्यात घसरले आहे. आयपीएलच्या लाईव्ह सामन्यात  मागच्या आठवड्यात ३३ टक्के घसरण पहायला मिळाली. मागच्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुसऱ्या आठवड्यात २८ टक्के घट झाली आहे.

आयपीएलशी संबंधित काही जाहिरात कंपन्यांनी  २०२२ च्या ऑन एअर कामगिरीवर नापसंती व्यक्त केली. जाहिरातदार कंपन्यांचे मत असे की यंदा आयपीएलचे रेटिंग आमच्या अपेक्षेनुसरु आलेले नाही. दिवसेंदिवस यात घसरण होत आहे. याआधी आयपीएलचे रेटिंग असे कधीही घसरले नव्हते. यंदा २० ते ३० टक्के घटले आहे. 

आम्ही मागच्या दरांच्या तुलनेत यंदा २५ टक्के अधिक रक्कम मोजली आहे. आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात खरेतर रेटिंग रेकॉर्डब्रेक व्हायला हवे. तथापि यंदा असे काहीही घडलेले नाही. सन टिव्ही नंबर वन असून एमएए टिव्ही दुसऱ्या तर स्टार स्पोर्ट्‌स नेटवर्क लोकप्रयतेच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२बीसीसीआय
Open in App