भूतकाळातील काही घटना अगदी तंतोतंतपणे वर्तमानात घडणे याला योगायोग म्हणतात. यंदाच्या आयपीएलमध्ये याची अनुभूती येते आहे. २०१६ आणि यंदाच्या आयपीएल हंगामात बऱ्याच गोष्टींत समानता दिसून आली. ती कशी ते पाहूयात...
आयपीएल २०१६
हंगाम सुरू होण्यापूर्वी नव्या प्रायोजकांचा प्रवेश. (विवो)
दोन नवीन संघ (गुजरात आणि पुणे)
सुपर जायंट्स नाव असलेल्या संघाचा आयपीएल प्रवेश (पुणे सुपर जायंट्स)
गुजरातचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी (गुजरात लायन्स)
चेन्नई आणि मुंबई संघाची कुठेही चर्चा नाही. (चेन्नईला प्रवेशबंदी, तर मुंबईची सुमार कामगिरी)
नावात ‘रॉयल’ असा उल्लेख असलेल्या संघाचा सलामीवीर ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत सर्वांत पुढे तसेच शतके आणि षट्कार मारण्यातही आघाडीवर. (विराट कोहली)
मुस्तफिजूर आणि युझवेंद्र चहल आपल्या टॉप फॉर्ममध्ये. (पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये)
आयपीएल २०२२
हंगाम सुरू होण्यापूर्वी नव्या प्रायोजकांचा प्रवेश. (टाटा)
दोन नवीन संघ (गुजरात आणि लखनौ)
सुपर जायंट्स नाव असलेल्या संघाचा आयपीएल प्रवेश (लखनौ सुपर जायंट्स)
गुजरातचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी (गुजरात टायटन्स)
चेन्नई आणि मुंबई संघाची कुठेही चर्चा नाही. (दोन्ही संघ तळाच्या स्थानी)
नावात ‘रॉयल’ असा उल्लेख असलेल्या संघाचा सलामीवीर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सर्वांत पुढे. तसेच शतके आणि षट्कार मारण्यातही आघाडीवर. (जोस बटलर)
मुस्तफिजूर आणि युझवेंद्र चहल आपल्या टॉप फॉर्ममध्ये. (पर्पल कॅपच्या शर्यतीत चहल अव्वल स्थानी)