Riyan Parag's Half-Helicopter Six Front Of MS Dhoni : आयपीएल २०२५ च्या हंगामातील पहिल्या दोन सामन्यात फुसका बार ठरलेला रियान पराग चेन्नई विरुद्धच्या सामन्यात लयीत खेळताना दिसला. एका बाजूला नितीश राणाची फटकेबाजी सुरु असताना त्याच्याही भात्यातून काही फटके पाहायला मिळाले. चांगली सुरुवात मिळाल्यावर तो ३७ धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने २ खणखणीत चौकारासह २ षटकारही ठोकले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धोनीसमोर आधी 'हेलिकॉप्टर' उडवलं, पण..
त्याच्या भात्यातून आलेला एक षटकार धोनीच्या हेलिकॉप्टर स्टाइलमध्ये आला. धोनीसमोर त्याने हा फटका खेळल्यामुळे याची सोशल मीडियावर चर्चाही रंगू लागली आहे. राजस्थान रॉयल्सच्या डावातील ११ व्या षटकात मलिंगाच्या अंदाजात गोलंदाजी करणारा मथीशा पथिरना गोलंदाजीने पहिलाच चेंडू त्याच्या पॅडवर टाकला. रियान परागनं हा चेंडू डिप स्क्वेअर लेगला सहा धावांसाठी टोलावला. त्याच्या या फटक्यात धोनीच्या हेलिकॉप्टर स्टाइलची झलक पाहायला मिळाली. या षटकात रियान पराग जिंकला. पण तिसऱ्या षटकात मथीशा पथिरना याने त्याचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे पाहायला मिळाले.
Nitish Rana 2nd Joint Fastest Fifty : राणादाची 'रॉयल' खेळी! फिफ्टीनंतर केलेल्या सेलिब्रेशनचीही चर्चा
मथीशा पथिरना असा घेतला बदला
अखेरच्या षटकात रियान परागच्या भात्यातून आणखी काही फटके पाहायला मिळतील अशी आशा होती. पण १८ व्या षटकात मथीशा पथिरना पुन्हा गोलंदाजीला आला अन् त्यानं परफेक्ट यॉर्कर लेंथ चेंडूवर रियान परागचा करेक्ट कार्यक्रम केला. या षटकात रियान पराग स्ट्राइकवर आल्यावर २ निर्धाव चेंडू टाकत मथीशा पथिरना आधी त्याच्या विकेटसाठी जाळं टाकलं अन् यॉर्कर चेंडू टाकत त्याचा त्रिफळा उडवला.
रियान परागनची यंदाच्या हंगामातील कामगिरी
रियान परागनं या सामन्यात २८ चेंडूचा सामना करताना १३२.१४ च्या स्ट्राइक रेटनं ३७ धावांचे योगदान दिले. राजस्थानच्या ताफ्यातून नितीश राणाच्या ८१ धावांच्या खेळीपाठोपाठ त्याची केलेली ही दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या ठरली. यंदाच्या हंगामात संजू सॅमसन सुरुवातीपासून इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात खेळत आहे. त्यामुळे रियान पराग राजस्थान संघाचे नेतृत्व करताना दिसतोय. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या पहिल्या सामन्यात रियान परागला फक्त ४ धावांची खेळी करता आली होती. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध त्याने १५ चेंडूत २५ धावांची खेळी केली. या दोन्ही सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला.