Join us  

टीम इंडियाकडून मानहानिकारक पराभवानंतर स्टीव्ह स्मिथला मोठा धक्का; संघातून झाली हकालपट्टी

टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्टीव्ह स्मिथला साजेशी कामगिरी करता आली नव्हती

By स्वदेश घाणेकर | Published: January 20, 2021 4:56 PM

Open in App

गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं आयपीएल २०२१च्या पर्वापूर्वी लसिथ मलिंगा आणि शेफ्राने रुथरफोर्ड यांना रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट नावावर असणाऱ्या मलिंगानं यूएईत झालेल्या स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याच्या वडिलांची प्रकृती खालावली होती. ( Mumbai to let go of Malinga, Rutherford) 

२०१९च्या लिलावात मुंबई इंडियन्सनं २ कोटींत मलिंगाला आपल्या ताफ्यात गेतले होते. २०१८च्या मोसमात मलिंगा खेळला नव्हता. २०१९च्या अंतिम सामन्यात मलिंगाचा अनुभव मुंबई इंडियन्सच्या कामी आला आणि त्यानं चेन्नई सुपर किंग्सला जेतेपदापासून दूर ठेवले. २०१३ व २०१५च्या अंतिम सामन्यातही मुंबईला जेतेपद जिंकून देण्यात मलिंगाचा मोठा वाटा होता. 

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रुथरफोर्डला २०१९च्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून ट्रेडमध्ये मुंबईनं घेतलं. त्यांनी मयांक मार्कंडेला दिल्लीला दिले. २०१८च्या ऑक्शनमध्ये दिल्लीनं रुथरफोर्डला २ कोटींत घेतले होते. २०२०च्या मोसमात रुथरफोर्डला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्येही त्याला चांगला खेळ करता आला नव्हता.

स्टीव्ह स्मिथचा पत्ता कट, राजस्थान रॉयल्स नव्या कर्णधारासह उतरणारराजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२०मध्ये गुणतालिकेत तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि त्यामुळे संघानं कर्णधार स्टीव्हन स्मिथला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी पर्वात राजस्तान नव्या कर्णधारासह मैदानावर उतरणार आहे. फलंदाज आणि कर्णधार म्हणून स्मिथला आयपीएलमध्ये आपली छाप पाडता आली नाही. त्यानं १४ सामन्यांत ३११ धावा केल्या आणि त्यात तीन अर्धशतकांचा समावेश होता. स्टीव्ह स्मिथला रिलीज केल्याच्या वृत्ताला सूत्रांनी दुजोरा दिला. ( Rajasthan Royals release Smith) 

दिल्ली कॅपिटल्स सलामीवीर जेसन रॉय, यष्टिरक्षक-फलंदाज अॅलेक्स केरी, फिरकीपटू संदीप लामिछाने आणि गोलंदाज मोहीत शर्मा  यांना रिलीज करणार आहेत.   

कोणाकडे किती रक्कम शिल्लकचेन्नई सुपर किंग्स ( CSK) - १५ लाख मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) - १.९५ कोटी  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Channel Bangalore ) - ६.४ कोटी कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) -  ८.५ कोटीदिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) - ९ कोटी किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) - १६.५ कोटीसनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) - १०.१ कोटी राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) - १४.७५ कोटी 

टॅग्स :आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनस्टीव्हन स्मिथराजस्थान रॉयल्समुंबई इंडियन्सलसिथ मलिंगा