IPL Restart No DJs No Dancing Girls Sunil Gavaskar Special Request BCCI : भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरु होणार आहे. २०२५ च्या १८ व्या हंगामातील उर्वरित १७ सामन्यांचे सुधारित वेळात्रकही निश्चित झाले आहे. १७ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लढतीने पुन्हा एकदा स्पर्धेला सुरुवात होतीये. उर्वरित सामन्याला सुरुवात होण्याआधी लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी बीसीसीआयला खास विनंती केली आहे. उर्वरित सामने हे म्युझिक सिस्टीमच्या स्वरुपात लावण्यात येणाऱ्या डीजे आणि चीअरलीडर्स शिवाय खेळवण्याची विनंती गावसकरांनी बीसीसीआयला केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डीजे नको अन् डान्सिंग गर्ल्सची नकोत, गावसकर काय म्हणाले?
स्पोर्ट्स टुडेशीच्या खास शोमध्ये गावसकर म्हणाले आहेत की, आयपीएलमध्ये आपण जवळपास ६० सामने खेळवले आहेत. अखेरच्या टप्प्यातील रंगत पाहणे उत्सुकतेचे असेल. आता फक्त सामने खेळवण्याचा विचार व्हायला हवा. सामन्यासाठी प्रेक्षकांची गर्दी झाली तरी हरकत नाही. पण उर्वरित सामन्यात डीजे वाजता कामा नये. नाचणाऱ्या चीअरलीडर्सही दिसायला नकोत. देशात जे काही घडलं त्यात काही कुटुंबियांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. त्यांच्या भावनेचा आदर राखला गेला पाहिजे, अशा शब्दांत गावसकरांनी सामन्यावेळी जल्लोषमय वातावरण नको, अशी विनंती बीसीसीआयला केली आहे.
टीम इंडियाची 'क्वीन' स्मृती मानधना नंबर वन 'ताज'सह मिरवण्याच्या तयारीत; इथं पाहा तिची कामगिरी
याआधी जे चित्र दिसलं तेच गावसकरांना उर्वरित सामन्यातही अपेक्षित
भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामच्या घोषणेनंतर सुनील गावसकरांनी आयपीएल स्पर्धेतीली उर्वरित सामन्याआधी ही सूचना केली आहे. जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ याआधीही आयपीएल सामन्यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला होता. उर्वरित सामन्यात तेच चित्र दिसणे गावसकरांना अपेक्षित आहे.