ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell Wedding Party) नुकताच भारतीय वंशाच्या विन्नी रमणसोबत विवाहबंधनात अडकला. या विवाहसोहळ्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि नजीकचे काही लोक उपस्थित होते. विवाहसोहळ्यानंतर मॅक्सवेलनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमला एक पार्टी दिली. या पार्टीमध्ये आरसीबीचे सर्वच खेळाडू सहभागी झाले होते. आता या पार्टीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात विराट कोहलीच्याही डान्सचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.
पार्टीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये टीमचे सर्वच जण कुर्ता पैजामा घालून गाण्यावर थिरकताना दिसत आहे. विराटच्याही डान्स मूव्ह्ज पाहण्याजोग्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या या डान्सला पसंती दिलीये. तर काही लोकांनी त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीवरूनही टीका केलीये.
आयपीएल २०२२ मध्ये आरसीबी हा संघ ९ सामन्यांमध्ये १० गुण मिळवत ५ व्या स्थानावर आहे. टीमची कामगिरी समाधानकारकच राहीली आहे. तर आयपीएलदरम्यान विराटलाही चांगली कामगिरी करता आलेली नाही. तो दोन वेळा शून्यावरही बाद झालाय.