RCB Victory Parade Stampede : उत्सवाचा क्षण अकल्पनिय दुर्घटनेत बदलला.. सचिन-युवराजचं भावूक ट्विट

मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांच्यासह क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी या बंगळुरमधील दुर्देवी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:06 IST2025-06-05T12:46:20+5:302025-06-05T13:06:42+5:30

whatsapp join usJoin us
IPL RCB Victory Parade Stampede Sachin Tendulkar Yuvraj Singh Condole | RCB Victory Parade Stampede : उत्सवाचा क्षण अकल्पनिय दुर्घटनेत बदलला.. सचिन-युवराजचं भावूक ट्विट

RCB Victory Parade Stampede : उत्सवाचा क्षण अकल्पनिय दुर्घटनेत बदलला.. सचिन-युवराजचं भावूक ट्विट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RCB Victory Parade Stampede :   आयपीएलमध्ये चॅम्पियन ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयी आनंदोत्सवात बुधवारी शोककळा पसरवणारी घटना घडली. बंगळुरुमध्ये RCB च्या विजयाच्या सेलिब्रेशनसाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत आरसीबीच्या चाहत्यांवर जीव गमावण्याची दुर्देवी घटना घडली. यावर वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांच्यासह क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी या बंगळुरमधील दुर्देवी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.  बुधवारी RCB चॅम्पियन संघाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ लोकांनी आपला जीव गमावला असून ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सचिन तेंडुलकरचं भावनिक ट्विट

सचिन तेंडुलकरनं  एक्स अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलंय की, बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये घडलेली घटना खपूच दु:खद आहे. या घटनेतील पीडित कुटुंबाप्रति मनापासून संवेदना आहेत. कुटुंबियांना यातून सावरण्याचं बळ मिळो. अशी मी प्रार्थना करतो. अशा आशयाच्या शब्दांत सचिन तेंडुलकरने या दुर्देवी घटनेत जीव गमावलेल्यांना श्रद्धांजलीही वाहिलीये.

"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक

जे घडलं ते अकल्पनिय 

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटर युवराज सिंग यानेही बंगळुरुच्या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने एक्स अकाउंटवरील पोस्टमध्ये लिहिलंय की, उत्सवाचा क्षण हा अकल्पनिय दुर्घटनेत रूपांतरित झाला. बंगळुरुच्या घटनेतील सर्व पीडित कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. पीडित कुटुंबियांना दु:खातून सावरण्याचे बळ मिळो. आरसीबीचा स्टार विराट कोहलीसह अनिल कुंबळे आणि अन्य दिग्गज क्रिकेटर्संनी या घटनेनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून  दु:ख व्यक्त केले आहे.

जल्लोष दिसला, पण शेवटी अनर्थ घडला

आयपीएलच्या १८ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने १७ वर्षांचा दुष्काळ संपवत पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. अहमदाबादचं मैदान मारून चॅम्पियन्स संघ बंगळुरुला पोहचल्यावर RCB च्या चाहत्यांनी जल्लोषात संघाचे स्वागत केले. खुल्या बसमधील परेड रद्द केल्यावरही चाहत्यांनी खेळाडूंच्या बस मार्गावर दुतर्फा गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या खेळाडूंच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाआधी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. ३५ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमबाहेर चाहत्यांनी लाखोच्या संख्येन गर्दी केली होती.
 

Web Title: IPL RCB Victory Parade Stampede Sachin Tendulkar Yuvraj Singh Condole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.