KKR च्या घरच्या मैदानात किंग कोहलीचा धमाका; RCB नं विजयी सलामीसह १८ वर्षांपूर्वीचा हिशोब केला चुकता!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून किंग कोहलीचे नाबाद अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 22:57 IST2025-03-22T22:56:06+5:302025-03-22T22:57:33+5:30

whatsapp join usJoin us
IPL Opening KKR vs RCB Virat Kohli stars as Royal Challengers Bengaluru chase down 175 in just 16.2 overs in Kolkata Agianst Kolkata Knight Riders | KKR च्या घरच्या मैदानात किंग कोहलीचा धमाका; RCB नं विजयी सलामीसह १८ वर्षांपूर्वीचा हिशोब केला चुकता!

KKR च्या घरच्या मैदानात किंग कोहलीचा धमाका; RCB नं विजयी सलामीसह १८ वर्षांपूर्वीचा हिशोब केला चुकता!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं घरच्या मैदानावर खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केले आहे. २००८ च्या पहिल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं बंगळुरुच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत करत विजयी सलामी दिली होती. १८ वर्षांनी हा हिशोब चुकता करत १८ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं विजयी सलामी दिली आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

केकेआरकडून अजिंक्यच्या अर्धशतकासह सुनील नरेननं केल्या सर्वाधिक धावा

कोलकाता नाईट राय़डर्सचा कर्णधार आजिंक्य रहाणे याने ३१ चेंडूत केलेल्या ५६ धावा, २६ चेंडूत  केलेल्या ४४ धावा आणि अंगकृष्ण रघुवंशी याने २२ चेंडूत केलेल्या २२ चेंडूतील ३० धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाताच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १७४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातून सलामीला आलेल्या फिल सॉल्ट आणि विराट कोहलीच्या भात्यातून अर्धशक आले.

धावांचा पाठलाग करताना सॉल्ट कोहलीची फिफ्टी, RCB नं अगदी सहजच मॅच जिंकली

  १७५ धावांचा पाठलाग करताना फिलिप सॉल्ट आणि विराट कोहलीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी करत सामन्यावर सुरुवातीपासूनच आपली पक़ड मजबूत केली. सॉल्टनं ३१ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ५६ धावांची खेळी केलीय. त्याची जागा घेण्यासाठी आलेला देवदत्त पडिक्कल १० चेंडूत १० धावा करून तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदार याने १६ चेंडूत ३४ धावा करताना ५ चौकार आणि १ षटकार मारला. विराट कोहली ३६ चेंडूत ४ टौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ५९ धावांची नाबाद खेळी केली. लायम लिविंगस्टोन याने ५ चेंडूत १५ धावा करत संघाचा विजय निश्चित केला. १७ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार मारत त्याने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 
 

Web Title: IPL Opening KKR vs RCB Virat Kohli stars as Royal Challengers Bengaluru chase down 175 in just 16.2 overs in Kolkata Agianst Kolkata Knight Riders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.