Join us

IPLपूर्वी बाथरुममध्ये गाणं गाताना दिसला धोनी, व्हिडीओ झाला वायरल

यंदाचे आयपीएल सुरु होण्यापूर्वी धोनी चक्क बाथरुममध्ये गाणे गाताना दिसला आहे आणि या गोष्टीचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 17:12 IST

Open in App

यंदाचे आयपीएल भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी फार महत्वाचे आहे. कारण या आयपीएलवर त्याचे भवितव्य अवलंबून आहे. कारण यंदाच्या आयपीएलमध्ये जर धोनी फेल झाला तर त्याची क्रिकेट कारकिर्द धोक्यात येऊ शकते. पण यंदाचे आयपीएल सुरु होण्यापूर्वी धोनी चक्क बाथरुममध्ये गाणे गाताना दिसला आहे आणि या गोष्टीचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार की नाही, घेणार तर कधी घेणार, तो टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळणार की मैदानाबाहेरच निवृत्ती जाहीर करणार, आदी अनेक प्रश्न चाहत्यांच्या डोक्यात बाऊंसरसारखे आदळत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) नुकत्याच जाहीर केलेल्या सेंट्रल काँट्रॅक्टमधून धोनीला वगळले आहे. त्यानंतर धोनीला निवृत्तीचे संकेत देण्यात आले, असाही अर्थ लावण्यात आला.

धोनीने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली, तर तो आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात आपल्याला दिसू शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे धोनीने आता आयपीएलच्या सरावावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच तो २९ फेब्रुवारीला चेन्नईला जाणार असून १ मार्चपासून सरावाला सुरुवात करणार आहे. जवळपास एक महिना सराव करून धोनी आयपीएलमध्ये उतरणार आहे.

आयपीएल सुरु होण्यापूर्वी धोनी मस्त मूडमध्ये दिसत आहे. धोनीबरोबर यावेळी पीयूष चावला आणि पार्थिव पटेल आहे. यावेळी व्हिडीओमध्ये धोनी 'मिस्टर एक्स इन बॉम्बे' मधील 'मेरे महबूब कयामत होगी' हे गाणे बाथरुममध्ये गाताना दिसत आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल