Join us

IPL Auction 2024: ७.४० कोटी! शाहरूख खानसाठी GT vs PBKS सामना; अखेर प्रीती झिंटाची माघार

IPL Mini Auction 2024 Live : आज आयपीएल २०२४ साठी दुबईत मिनी लिलाव प्रक्रिया पार पडत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 17:52 IST

Open in App

IPL Mini Auction 2024 Live Updates In Marathi : आयपीएल २०२४ साठी दुबईत मिनी लिलाव पार पडत असून, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बक्कळ कमाई केली. मिचेल स्टार्कने सर्वाधिक भाव खात ऐतिहासिक २४.७५ कोटींचा गल्ला कमावला. तर पॅट कमिन्सने २०.५० कोटी रूपये कमावले. परदेशी खेळाडूंसह भारताच्या युवा खेळाडूंवर मोठी बोली लागली. युवा भारतीय शाहरूख खानला ७.४० कोटी रूपये मिळाले असून तो गुजरात टायटन्सच्या संघाचा भाग झाला. 

शाहरूख खानला खरेदी करण्यासाठी पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात चुरस पाहायला मिळाली. दोन्हीही फ्रँचायझी पाच-पाच लाखाची रक्कम वाढवून शाहरूखसाठी लढत होत्या. ४० लाखापासून सुरू झालेली बोली बघता बघता सात कोटीच्या पार गेली. अखेर प्रीती झिंटाने माघार घेतली अन् शाहरूख गुजरातच्या संघाचा भाग झाला. त्याला ७.४० कोटी रूपयांत गुजरातने खरेदी केले. 

मिनी लिलाव २०२३ मधील महागडे खेळाडू -

मिचेल स्टार्क - कोलकाता नाईट रायडर्स (२४.७५ कोटी)डॅरिल मिचेल - चेन्नई सुपर किंग्स (१४ कोटी)हर्षल पटेल - पंजाब किंग्स (११.७५ कोटी)पॅट कमिन्स - सनरायझर्स हैदराबाद (२०.५० कोटी)ट्रॅव्हिस हेड - सनरायझर्स हैदराबाद (६.८० कोटी)हॅरी ब्रूक - दिल्ली कॅपिटल्स (४ कोटी)रोवमन पॉवेल - राजस्थान रॉयल्स (७.४० कोटी)शिवम मावी ( लखनौ सुपर जायंट्स ) - ६.४० कोटीउमेश यादव ( गुजरात टायटन्स) - ५.८० कोटीगेराल्ड कोएत्झी ( मुंबई इंडियन्स ) - ५ कोटी

शाहरूख खान (गुजरात टायटन्स) - ७.४० कोटी

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२३गुजरात टायटन्सपंजाब किंग्सशाहरुख खान