IPL 2024 SRH vs MI: मुंबईने टॉस जिंकला! सचिनकडून रोहितला खास गिफ्ट, हार्दिकने केला १ बदल

IPL 2024 SRH vs MI Live Score Card: आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 07:04 PM2024-03-27T19:04:02+5:302024-03-27T19:04:14+5:30

whatsapp join usJoin us
Ipl Match 2024 live score SRH vs MI Mumbai Indians captain Hardik Pandya won the toss and decided to bowl first, Sachin Tendulkar gifted special 200th jersey to Rohit Sharma | IPL 2024 SRH vs MI: मुंबईने टॉस जिंकला! सचिनकडून रोहितला खास गिफ्ट, हार्दिकने केला १ बदल

IPL 2024 SRH vs MI: मुंबईने टॉस जिंकला! सचिनकडून रोहितला खास गिफ्ट, हार्दिकने केला १ बदल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 SRH vs MI Live Updates In Marathi | हैदराबाद: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील आठवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. दोन्हीही संघ आपल्या सलामीच्या सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे आज एक संघ विजयाचे खाते उघडेल हे निश्चित. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. मुंबईला आपल्या पहिल्या सामन्यात गुजरातकडून तर हैदराबादला केकेआरकडून पराभव पत्करावा लागला होता. (IPL 2024 News)

आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्हीही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला. यजमान संघात ट्रॅव्हिस हेड आणि जयदेव उनाडकट यांची एन्ट्री झाली आहे. तर मुंबईच्या संघात ल्यूक वुडच्या जागी Kwena Maphaka ला संधी मिळाली आहे. मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा मुंबईसाठी आज २०० वा सामना खेळत आहे.

आजचा सामना जिंकून दोन गुण मिळवण्याचे आव्हान दोन्हीही संघांसमोर असेल. खरं तर दोन्हीही संघ यंदाच्या हंगामात नव्या कर्णधारांच्या नेतृत्वात खेळत आहेत. हार्दिक पांड्याची घरवापसी झाली असून त्याला मुंबईच्या संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. तर सनरायझर्स हैदराबादने २०.५० कोटी रूपयांना खरेदी केलेल्या पॅट कमिन्सवर कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.  

आजच्या सामन्यासाठी मुंबईचा संघ -
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित  शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नमन धीर, गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, शम्स मुलाणी, क्वेना महाका.

आजच्या सामन्यासाठी हैदराबादचा संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड,  भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय आणि जयदेव उनाडकट. 

सचिनकडून रोहितला खास जर्सी भेट

दरम्यान, आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH vs MI) यांच्यात सामना होत आहे. हा सामना मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मासाठी खास आहे. कारण रोहित मुंबईसाठी २०० वा सामना खेळत आहे. २०११ मध्ये तो मुंबईच्या फ्रँचायझीसोबत जोडला गेला. मागील १४ वर्षात हिटमॅनने मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत १९९ सामना खेळले असून ५०८४ धावा केल्या आहेत. २०१३ मध्ये रिकी पॉन्टिगनंतर रोहित शर्माने मुंबईचे कर्णधारपद सांभाळले. तेव्हापासून तो २०२३ पर्यंत मुंबईचा कर्णधार राहिला. रोहितने कर्णधारपदाच्या पदार्पणाच्या हंगामातच पहिले जेतेपद पटकावले. मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएल जिंकली आहे. त्यामुळे हैदराबादविरूद्धचा सामना रोहितसाठी ऐतिहासिक आहे. 

Web Title: Ipl Match 2024 live score SRH vs MI Mumbai Indians captain Hardik Pandya won the toss and decided to bowl first, Sachin Tendulkar gifted special 200th jersey to Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.