IPL 2024: मी SRH विरूद्ध जे पाहिलं त्याचा आनंदच आहे; सामन्यानंतर असं का म्हणाला हार्दिक?

IPL 2024 SRH vs MI Live: सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा पराभव करून विजयाचे खाते उघडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 11:51 PM2024-03-27T23:51:08+5:302024-03-27T23:51:28+5:30

whatsapp join usJoin us
Ipl Match 2024 live score SRH vs MI Captain Hardik Pandya reacts after Sunrisers Hyderabad beat Mumbai Indians by 31 runs | IPL 2024: मी SRH विरूद्ध जे पाहिलं त्याचा आनंदच आहे; सामन्यानंतर असं का म्हणाला हार्दिक?

IPL 2024: मी SRH विरूद्ध जे पाहिलं त्याचा आनंदच आहे; सामन्यानंतर असं का म्हणाला हार्दिक?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 SRH vs MI Live Updates In Marathi | हैदराबाद: हैदराबादने मुंबईला नमवून विजयाचे खाते उघडले. सनरायझर्स हैदराबादने धावांचा डोंगर उभारल्यानंतर मुंबई इंडियन्सने खूप संघर्ष केला. सलामीवीर इशान किशन आणि त्यानंतर तिलक वर्मा यांनी अप्रतिम खेळी करून सामन्यात रंगत आणली. पण तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला अपयश आले. हैदराबादने दिलेल्या २७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला घाम फुटला. मुंबईचा संघ निर्धारित २० षटकांत ५ बाद २४६ धावा करू शकला आणि सामना ३१ धावांनी गमावला. (IPL 2024 News) २७८ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी चांगला संघर्ष केला.

रोहित शर्मा (२६), इशान किशन (३४), नमन धीर (३०), तिलक वर्मा (६४), हार्दिक पांड्या (२४), टीम डेव्हिड (नाबाद ४२ धावा) आणि रोमिरियो शेफर्डने नाबाद १५ धावा केल्या. यजमान संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने गोलंदाजीत कमाल केली. इतर सर्व गोलंदाजांची धुलाई होत असताना कमिन्सने ४ षटकांत ३५ धावा देत २ बळी घेतले. 

सामना गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितले की, रोहित, इशान किशन, तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड यांनी अप्रतिम फलंदाजी केली... त्यांच्या खेळीचे कौतुक करायलाच हवे. पण मला वाटते की, आम्ही काही वेगळ्या गोष्टी करून पाहू शकलो असतो. पंरतु, आमच्या संघात युवा गोलंदाजांची फौज आहे, ते घातक गोलंदाजी करू शकतात आणि ते पाहून मला खूप आनंद झाला. 

हैदराबादचा ३१ धावांनी विजय 
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने धावांचा डोंगर उभारला. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन आणि एडन मार्करम यांनी हार्दिकसेनेची चांगलीच धुलाई केली. विशेष बाब म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या करून हैदराबादच्या संघाने इतिहास रचला. मुंबईसमोर विजयासाठी तब्बल २७८ धावांचे आव्हान होते. यजमान हैदराबादने निर्धारित २० षटकांत ३ बाद २७७ धावा केल्या होत्या. 

यजमान संघाकडून हेडने ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूत ६२ धावा केल्या. तर अभिषेक शर्माने ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २३ चेंडूत ६३ धावा कुटल्या. एडन मार्करम आणि हेनरिक क्लासेन यांनी देखील हात साफ केले. एडन मार्करमने १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २८ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या, तर हेनरिक क्लासेनने ७ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ३४ चेंडूत ८० धावा कुटल्या आणि ऐतिहासिक धावसंख्या उभारली. 

Web Title: Ipl Match 2024 live score SRH vs MI Captain Hardik Pandya reacts after Sunrisers Hyderabad beat Mumbai Indians by 31 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.