Join us  

IPL 2024 SRH vs MI: कर्णधाराच्या एका चुकीमुळे मुंबईची धुलाई; समालोचकांनीही समजावलं गणित

IPL 2024 SRH vs MI Live: सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 8:54 PM

Open in App

IPL 2024 SRH vs MI Live Updates In Marathi | हैदराबाद: मुंबई इंडियन्सचा संघ नेहमी युवा खेळाडूंना संधी देत आला आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील आपल्या दुसऱ्या सामन्यात मुंबईने १७ वर्षीय गोलंदाजाला संधी दिली. १९ वर्षाखालील विश्वचषकात चमक दाखवणाऱ्या क्वेना मफाकाला हैदराबादविरूद्धच्या सामन्यात संधी मिळाली. पण, या युवा खेळाडूची चांगलीच धुलाई झाली. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने महाकाला पहिले षटक टाकायला दिले. मात्र पहिल्याच षटकापासून ट्रॅव्हिस हेडने स्फोटक खेळी करायला सुरूवात केली. 

सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना होत आहे. हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने सुरुवातीपासूनच स्फोटक खेळी केली. ट्रॅव्हिस हेडने अवघ्या १८ चेंडूत ५० धावा करून ऐतिहासिक खेळी केली. मयंक अग्रवाल स्वस्तात परतल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने स्फोटक खेळी करून मुंबईची डोकेदुखी वाढवली. त्याने २४ चेंडूत ६२ धावा कुटल्या. हेडच्या खेळीत ३ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश राहिला. घातक वाटणाऱ्या हेडला बाद करण्यात गेराल्ड कोएत्झीला यश आले.

SRH चे वादळ

हेडला अभिषेक शर्माने चांगली साथ अन् दिली अन् काही मिनिटांतच हेडचा विक्रम मोडला. अभिषेक हैदराबादकडून सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरला. त्याने अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावण्याची किमया साधली. अभिषेक शर्माने ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २३ चेंडूत ६३ धावांची स्फोटक खेळी केली. आयपीएलच्या इतिहासात पहिल्या १० षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील या सामन्यात झाला. सनरायझर्स हैदराबादने १० षटकांत २ बाद १४८ धावा करून मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. 

लक्षणीय बाब म्हणजे जसप्रीत बुमराहसारखा स्टार गोलंदाज असताना त्याला पहिले षटक न दिल्याने समालोचकांनी देखील प्रश्न उपस्थित केले. सलामीच्या सामन्यात देखील याचा प्रत्यय आला होता. आजही हार्दिकने युवा खेळाडूकडे नवीन चेंडू सोपवला. बुमराहला चौथे षटक टाकण्याची संधी दिली. खरं तर हैदराबादने पहिल्या ७ षटकांतच १०० धावांचा आकडा गाठला आणि १० षटकांत २ बाद १४८ धावा कुटल्या. बुमराह वगळता मुंबईच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई झाली. 

तत्पुर्वी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्हीही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला. यजमान संघात ट्रॅव्हिस हेड आणि जयदेव उनाडकट यांची एन्ट्री झाली आहे. तर मुंबईच्या संघात ल्यूक वुडच्या जागी Kwena Maphaka ला संधी मिळाली आहे. 

आजच्या सामन्यासाठी हैदराबादचा संघ -पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड,  भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय आणि जयदेव उनाडकट. 

आजच्या सामन्यासाठी मुंबईचा संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित  शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नमन धीर, गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, शम्स मुलाणी, क्वेना महाका.

टॅग्स :हार्दिक पांड्याजसप्रित बुमराहमुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबाद