Join us  

IPL 2024 RR vs LSG: राजस्थानची विजयी सलामी; पूरनची एकतर्फी झुंज; राहुलचा 'क्लास' पण...

IPL 2024 RR vs LSG Live Score Card: राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध १२ धावांनी विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 7:29 PM

Open in App

IPL 2024 RR vs LSG Live Score Cardराजस्थान रॉयल्सने दिलेल्या १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सला अपयश आले. (LSG vs RR) कर्णधार लोकेश राहुलने संयमी खेळी करून संघर्ष केला. पण त्याला देखील आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्याच्याशिवाय निकोलस पूरनने अखेरपर्यंत संघर्ष करत स्फोटक खेळी केली. (IPL 2024 News) पण, अखेरच्या षटकात लखनौला विजयासाठी तब्बल २७ धावांची गरज होती. आवेश खानने शेवटचे षटक अप्रतिम टाकून राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. लखनौचा संघ निर्धारित २० षटकांत ६ बाद १७३ धावा करू शकला आणि सामना २० धावांनी गमावला. पूरनने ४१ चेंडूत नाबाद ६४ धावा कुटल्या. तर कर्णधार राहुलने ५८ धावांची खेळी केली.

राजस्थानच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करत धावांचा बचाव केला. ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक २ बळी घेतल, तर नंद्रे बर्गर, आर अश्विन, युझवेंद्र चहल आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने निर्धारित २० षटकांत ४ बाद १९३ धावा केल्या होत्या. आपला संघ अडचणीत असताना त्याने एकट्याने किल्ला लढवला. सॅमसनने ६ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ५२ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी केली. त्याला रियान परागने (४३) चांगली साथ दिली. लखनौकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक २ बळी घेतले, तर मोहसिन खान आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी १-१ बळी घेतला.

लखनौचा संघ -लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, यश ठाकूर, मोहसिन खान.  राजस्थानचा संघ - संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, रियान पराग, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.

टॅग्स :लोकेश राहुलसंजू सॅमसनलखनौ सुपर जायंट्सराजस्थान रॉयल्स