Join us

IPL 2024 RCB vs PBKS: धवनचा 'डुप्लीकेट' मोठ्या स्क्रीनवर दिसला; किंग कोहली लय भारी हसला

IPL 2024 RCB vs PBKS Live Score Card: पंजाब किंग्जने आरसीबीला विजयासाठी १७७ धावांचे आव्हान दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 21:42 IST

Open in App

IPL 2024 RCB vs PBKS Live Updates In Marathi | बंगळुरू: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज (PBKS vs RCB) यांच्यात होत आहे. आरसीबीला आपल्या सलामीच्या सामन्यात चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. खरं तर आरसीबी यंदाच्या हंगामातील दुसराच सामना आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहे. पंजाब आणि बंगळुरू यांच्यात चिन्नस्वामी स्टेडियमवर लढत होत आहे. दरम्यान, पंजाबच्या डावादरम्यान एक अनोखी घटना घडली. प्रेक्षक गॅलरीत बसलेला शिखर धवनचा डुप्लीकेट (Shikhar Dhawan Duplicate) अचानक मोठ्या स्क्रीनवर आला अन् किंग कोहलीला हसू अनावर झाले. (IPL 2024 News) 

डुप्लीकेट धवनला कॅमेरामॅनने बराच वेळ मोठ्या स्क्रीनवर दाखवले. विराट कोहलीचे याकडे लक्ष जाताच तो हसू लागला. विराटचा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, नाणेफेक जिंकून यजमान आरसीबीने पाहुण्या पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पंजाबला जॉनी बेअरस्टोच्या रूपात सुरुवातीलाच एक मोठा झटका बसला. त्यानंतर कर्णधार शिखर धवनने मोर्चा सांभाळला. त्याने सावध खेळी करत डाव पुढे नेला, ज्याला सिमरन सिंगने साथ दिली. पंजाबकडून शिखर धवनने सर्वाधिक (४५) धावा केल्या, तर जॉनी बेअरस्टो (८), सिमरन सिंग (२५), लियाम लिव्हिंगस्टोन (१७), सॅम करन (२३), जितेश शर्माने (२७) धावा केल्या. अखेरीस शशांक सिंगने २० चेंडूत २७ धावांची नाबाद खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या. 

पंजाब किंग्जचा संघ -शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत बरार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग. 

बंगळुरूचा संघ -फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंत डागर आणि मोहम्मद सिराज. 

टॅग्स :विराट कोहलीशिखर धवनरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपंजाब किंग्स