IPL 2024 PBKS vs DC: कोण आहे २१ वर्षीय अभिषेक पोरेल? ज्यानं एकाच षटकात कुटल्या २५ धावा

IPL 2024 PBKS vs DC Live Score Card: अभिषेक पोरेलने हर्षल पटेलच्या एका षटकात २५ धावा कुटल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 07:03 PM2024-03-23T19:03:09+5:302024-03-23T19:04:21+5:30

whatsapp join usJoin us
Ipl Match 2024 live score PBKS vs DC Delhi Capitals 21-year-old Abhishek Porel scored 32 off 10 balls at a strike rate of 320 and scored 25 off Harshal Patel's over | IPL 2024 PBKS vs DC: कोण आहे २१ वर्षीय अभिषेक पोरेल? ज्यानं एकाच षटकात कुटल्या २५ धावा

IPL 2024 PBKS vs DC: कोण आहे २१ वर्षीय अभिषेक पोरेल? ज्यानं एकाच षटकात कुटल्या २५ धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Who Is Abhishek Porel: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज हे संघ भिडले. (PBKS vs DC) नाणेफेक जिंकून शिखर धवनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (IPL 2024 News) पंजाबच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करून दिल्लीला कोंडीत पकडले. पण इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात आलेल्या २१ वर्षीय अभिषेक पोरेलने सर्वांना प्रभावित केले. (Abhishek Porel Inning) त्याने दिल्लीच्या डावाच्या अखेरच्या षटकात २५ धावा केल्या. पर्पल कॅप विजेता राहिलेल्या हर्षल पटेलची शेवटच्या षटकात चांगलीच धुलाई झाली. (Abhishek Porel Video) 

कोण आहे अभिषेक पोरेल?
अभिषेक पोरेलचा जन्म १७ ऑक्टोबर २००२ मध्ये पश्चिम बंगालमधील चंदननगर येथे झाला. त्याचा मोठा भाऊ इशान पोरेल देखील आयपीएल खेळला आहे, त्याने २०२१ मध्ये पंजाब किंग्जच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. अभिषेक एक यष्टीरक्षक फलंदाज आहे. २०२१-२२ च्या रणजी करंडक हंगामात बडोद्याविरूद्धच्या सामन्यातून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पश्चिम बंगालसाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 

अभिषेक पोरेलने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटच्या कारकिर्दीत १६ सामन्यात ६९५ धावा केल्या आहेत. त्याला आतापर्यंत ६ अर्धशतके झळकावता आली असून त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही ७३ आहे. 

अखेरच्या षटकात पाडला 'इम्पॅक्ट'

दिल्लीकडून अखेरच्या षटकात इम्पॅक्ट प्लेअर अभिषेक पोरेलने चमकदार कामगिरी केली. पंजाबकडून शेवटचे षटक हर्षल पटेलने टाकले. अभिषेकने या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार लगावला. मग षटकार आणि आणखी एक चौकार मारून आपल्या चाहत्यांना जागे केले. चौथ्या चेंडूवर देखील चौकार मारून अभिषेकने आपली छाप सोडली. तसेच पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून त्याने हर्षलला घाम फोडला. अखेरच्या चेंडूवर दोन धावा काढण्याच्या प्रयत्नात असताना कुलदीप यादव धावबाद झाला. पण अभिषेकने ३२० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करून दिल्लीची धावसंख्या १७४ पर्यंत पोहोचवली. त्याने अखेरच्या षटकात २५ धावा कुटल्या. १० चेंडूत ३२ धावा करून अभिषेकने सन्मानजनक धावसंख्या उभारली. 

Web Title: Ipl Match 2024 live score PBKS vs DC Delhi Capitals 21-year-old Abhishek Porel scored 32 off 10 balls at a strike rate of 320 and scored 25 off Harshal Patel's over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.