IPL 2024 GT vs MI: WHAT A BALL! मुंबईची फास्ट लोकल सुस्साट! बुमराहचा अप्रतिम यॉर्कर

IPL 2024 GT vs MI Live Score Card: जसप्रीत बुमराहने अप्रतिम यॉर्कर टाकून वृध्दीमान साहाला बाहेरचा रस्ता दाखवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 08:12 PM2024-03-24T20:12:17+5:302024-03-24T20:12:26+5:30

whatsapp join usJoin us
Ipl Match 2024 live score GT vs MI Jasprit Bumrah bowled an amazing yorker to get Wriddhiman Saha's wicket | IPL 2024 GT vs MI: WHAT A BALL! मुंबईची फास्ट लोकल सुस्साट! बुमराहचा अप्रतिम यॉर्कर

IPL 2024 GT vs MI: WHAT A BALL! मुंबईची फास्ट लोकल सुस्साट! बुमराहचा अप्रतिम यॉर्कर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 GT vs MI Live Updates In Marathi | अहमदाबाद: जसप्रीत बुमराहने नेहमीप्रमाणे आपल्या संघाला पहिला बळी मिळवून दिला. आज गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. (MI vs GT Live) दोन्हीही संघ प्रथमच नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात खेळत आहेत. हार्दिक पांड्याची मुंबईच्या संघात घरवापसी झाली (IPL 2024 Video) असून त्याला कर्णधार बनवण्यात आले आहे. तर शुबमन गिलच्या खांद्यावर गुजरातच्या संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. (IPL 2024 News) 

मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने पहिले षटक टाकले. त्यानंतर ल्यूक वुडने षटक टाकले. मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह चौथे षटक टाकायला आला. या षटकातील अखेरच्या चेंडूवर बुमराहने वृद्धीमान साहाचा त्रिफळा काढला. बूम बूम बुमराहने अप्रतिम यॉर्कर टाकून साहाला गारद केले. 

मुंबईचा संघ -
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, नमन धीर, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, शम्स मुलाणी, गेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.

गुजरातचा संघ -
शुबमन गिल (कर्णधार), वृद्धीमान साहा, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अजमतुल्लाह उमरजई, राशिद खान, उमेश यादव, साई किशोर आणि स्पेंसर जॉन्सन. 

दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएची ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी हार्दिक पांड्याची घरवापसी झाली आहे. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने सलग दोन हंगामात अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. २०२२ मध्ये हार्दिकसेनेने पदार्पणाच्या हंगामात किताब जिंकण्याची किमया साधली. 

Web Title: Ipl Match 2024 live score GT vs MI Jasprit Bumrah bowled an amazing yorker to get Wriddhiman Saha's wicket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.