IPL 2024 GT vs MI: हार्दिकनं 'अशी' फिल्ड सेट केली, चाहत्यांना खटकलं; समालोचकांनीही घेतली फिरकी

IPL 2024 GT vs MI Live Score Card: गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी १६९ धावांचे आव्हान दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 10:28 PM2024-03-24T22:28:00+5:302024-03-24T22:30:09+5:30

whatsapp join usJoin us
Ipl Match 2024 live score GT vs MI Commentators react as Hardik Pandya sets the field for Rohit Sharma | IPL 2024 GT vs MI: हार्दिकनं 'अशी' फिल्ड सेट केली, चाहत्यांना खटकलं; समालोचकांनीही घेतली फिरकी

IPL 2024 GT vs MI: हार्दिकनं 'अशी' फिल्ड सेट केली, चाहत्यांना खटकलं; समालोचकांनीही घेतली फिरकी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 GT vs MI Live Updates In Marathi | अहमदाबाद: मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना गुजरातला १६८ धावांत रोखले. मुंबईचा संघ प्रथमच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत आहे. विशेष बाब म्हणजे माजी कर्णधार रोहित शर्मा देखील संघाचा भाग आहे. क्षेत्ररक्षणादरम्यान अनेकदा रोहितने पांड्याला मार्गदर्शन केले. (Rohit Sharma) पण, फिल्ड सेट करताना हार्दिकने रोहितला सीमारेषेजवळ क्षेत्ररणासाठी पाठवले. वारंवार हिटमॅनची जागा बदलल्याने संतापलेल्या चाहत्यांना हार्दिकला ट्रोल करण्याची आयती संधी मिळाली. समालोचक सुरेश रैना आणि केव्हिन पीटरसन यांनी देखील यावरून फिरकी घेतली. (IPL 2023 News)

हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो फिल्ड सेट करत असताना रोहितला सीमारेषेकडे पाठवतो. याचा दाखला देत रैनाने म्हटले की, आता हार्दिक पांड्या कर्णधार आहे, त्यामुळे रोहित शर्माला ऐकावेच लागेल. 

हार्दिकचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये पाहायला मिळते की, जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत असताना प्रेक्षक 'रोहित रोहित'च्या घोषणा देत आहेत. यावरून समालोचक केव्हिन पीटरसन म्हणाला की, भारतात शेवटच्या वेळी भारतीय क्रिकेटपटूची बदनामी कधी झाली होती? मला माहिती देखील नाही. ही एक दुर्मिळ घटना आहे.

मुंबईचा संघ -
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, नमन धीर, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, शम्स मुलाणी, गेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.

गुजरातचा संघ -
शुबमन गिल (कर्णधार), वृद्धीमान साहा, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अजमतुल्लाह उमरजई, राशिद खान, उमेश यादव, साई किशोर आणि स्पेंसर जॉन्सन. 

Web Title: Ipl Match 2024 live score GT vs MI Commentators react as Hardik Pandya sets the field for Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.