Join us  

IPL 2024 GT vs MI: "आमचा कर्णधार रोहित शर्माच", नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चाहत्याकडून पोस्टरबाजी!

IPL 2024 GT vs MI Live Score Card: गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी १६९ धावांचे आव्हान दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 10:03 PM

Open in App

IPL 2024 GT vs MI Live Updates In Marathi | अहमदाबाद: सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील लढत नाना कारणांनी महत्त्वाची आहे. दोन्हीही संघ नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात आहे. गुजरात टायटन्सचा माजी कर्णधार हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार बनला आहे, शुबमन गिल प्रथमच कर्णधापद सांभाळत आहे.  (GT vs MI) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. (Rohit Sharma Fan) यजमान गुजरातने प्रथम फलंदाजी करताना साजेशी कामगिरी केली. गुजरात टायटन्सनेमुंबई इंडियन्सला विजयासाठी १६९ धावांचे आव्हान दिले. (IPL 2024 News)

हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार झाल्यापासून चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त करत आहेत. अशातच मुंबई आणि गुजरात यांच्यातील सामन्यादरम्यान एका चाहत्याने 'आमचा कॅप्टन रोहित शर्मा' अशा आशयाचे पोस्टर झळकावले. हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

मुंबईकडून कर्णधार हार्दिक पांड्याने पहिले षटक टाकून डावाची सुरुवात केली. बुमराहला चौथ्या षटकात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. या षटकातील अखेरचा चेंडू मुंबईला पहिला बळी देऊन गेला. गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक (४५) धावा केल्या, पण त्याला देखील बुमराहने आपल्या जाळ्यात फसवले. कर्णधार शुबमन गिल (३१), वृद्धीमान साहा (१९), अजमतुल्लाह उमरजई (१७), डेव्हिड मिलर (१२), राहुल तेवतिया (२२),  मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर गेराल्ड कोएत्झी (२) आणि पियुष चावलाला (१) बळी घेण्यात यश आले. 

मुंबईचा संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, नमन धीर, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, शम्स मुलाणी, गेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.

गुजरातचा संघ -शुबमन गिल (कर्णधार), वृद्धीमान साहा, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अजमतुल्लाह उमरजई, राशिद खान, उमेश यादव, साई किशोर आणि स्पेंसर जॉन्सन. 

टॅग्स :रोहित शर्माहार्दिक पांड्यागुजरात टायटन्समुंबई इंडियन्सआयपीएल २०२४