Join us

IPL Auction 2018: भारताचा कर्दनकाळ ठरला 7.20 कोटींची धनी

भारताला इंग्लंड दौऱ्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. या दौऱ्यात इंग्लंडचा एक खेळाडू भारतासाठी कर्दनाळ ठरला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 18:43 IST

Open in App

मुंबई, आयपीएल लिलाव 2019 : भारताला इंग्लंड दौऱ्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. या दौऱ्यात इंग्लंडचा एक खेळाडू भारतासाठी कर्दनाळ ठरला होता. पण या खेळाडूलाच आयपीएलच्या लिलावात तब्बल 7.20 कोटी रुपये मिळाले आहेत. हा खेळाडू आहे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत युवा सॅमने इंग्लंडच्या संघात पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच मालिकेत तो संघाच्या विजयाचा नायक ठरला होता. भेदक गोलंदाजी करून त्याने भारताच्या फलंदाजांना वेठीस आणले होते. त्याचबरोबर तळाचा फलंदाज म्हणून त्याने धावाचा रतीबही घातला होता. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये 2 कोटी ही त्याची मूळ किंमत ठेवण्यात आली होती, पण किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने 7.20 कोटी रुपये मोजत त्याला आपल्या संघात दाखल करून घेतला आहे.

टॅग्स :सॅम कुरेनआयपीएलआयपीएल लिलाव 2018आयपीएल लिलाव