Join us

IPL : त्याच्यासाठी तब्बल 9.40 कोटी मोजले आणि तडकाफडकी काढले

आयपीएलमधी कोलकाता नाईट रायडर्स संघाने गेल्या वर्षी 9.40 कोटी रुपये मोजून एका खेळाडूला संघात स्थान दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 15:38 IST

Open in App
ठळक मुद्देआयपीएलमध्ये खेळाडूंचा लिलाव केला जातो.एक ठराविक किंमत ठरवण्यात येते आणि त्यानुसार खेळाडूला आपल्या संघात घेतले जाते. आयपीएलमध्ये तब्बल 9.40 कोटी रुपये मोजत एका संघाने खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले, पण त्यानंतर त्याला तडकाफडकी संघाबाहेर काढण्यातही आहे.

मुंबई : आयपीएलमध्ये खेळाडूंचा लिलाव केला जातो. एक ठराविक किंमत ठरवण्यात येते आणि त्यानुसार खेळाडूला आपल्या संघात घेतले जाते. आयपीएलमध्ये तब्बल 9.40 कोटी रुपये मोजत एका संघाने खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले, पण त्यानंतर त्याला तडकाफडकी संघाबाहेर काढण्यातही आहे. त्यामुळे आयपीएलच्या संघांत नेमके चालले तरी काय, हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे.

आयपीएलमधी कोलकाता नाईट रायडर्स संघाने गेल्या वर्षी 9.40 कोटी रुपये मोजून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि फलंदाजांचा कर्दनकाळ समजल्या जाणाऱ्या मिचेल स्टार्कला संघात घेतले होते. पण स्टार्कला एकही सामना न खेळवता त्यांनी त्याला संघाबाहेर काढले आहे.

सध्याच्या घडीला स्टार्क हा ऑस्ट्रेलियाचा अव्वल वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे त्याला कोलकाता नाईट रायडर्सने का खेळवले नाही, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण गेल्या वर्षी स्टार्क हा दुखापतग्रस्त होता, त्यामुळे त्याला एकही सामना खेळता आला नव्हता. पण आगामी हंगामासाठी त्याला संघात का ठेवण्यात आले नाही, याचे उत्तर मात्र कोलकाता नाईट रायडर्स संघाने दिले नाही.

टॅग्स :आयपीएलकोलकाता नाईट रायडर्स