Join us
Daily Top 2Weekly Top 5

"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली

IPL ची मोठी किंमत मोजावी लागली, माझी कारकिर्द संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 17:56 IST

Open in App

Kevin Pietersen Sasy I lost My Career Because Of IPL :  आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्सच्या संघाकडून महागड्या खेळाडूच्या रुपात IPL पदार्पण करणारा इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने मोठं वक्तव्य केले आहे. आयपीएलमुळे करिअर संपलं, असा दावा त्याने केलाय. २००९ च्या हंगामात RCB च्या संघाने त्याच्यासाठी  ७. ५ कोटी इतकी रक्कम मोजली होती. इंडियन प्रीमियर लीग (IPL) ला प्राधान्य देण्याच्या निर्णयामुळे इंग्लंड क्रिकेट व्यवस्थापनासोबत वाद निर्माण झाला आणि त्यामुळेच राष्ट्रीय संघातील स्थान गमावले, असे त्याने रणवीर अलाहबादिया याच्यासोबतच्या खास मुलाखतीत सांगितले. तो नेमकं काय म्हणाला? त्याच्या या भूमिकेचा कुणाला फायदा झाला? जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

IPL ची मोठी किंमत मोजावी लागली, माझी कारकिर्द संपली

सध्याच्या घडीला इंग्लिश क्रिकेटपटूंना IPL मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा आहे. पण आमच्या वेळी ही मुभा नव्हती, असे मत  मांडताना पीटरसन म्हणाला की, " मी मोठा त्याग केला. माझी कारकीर्द संपली. IPL खेळण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे इग्लंड अँण्ड वेस्ट क्रिकेट बोर्डातील मंडळातील सर्वजण माझ्या विरोधात गेले. ३३ व्या वर्षी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला अचानक ब्रेक लागला. तोपर्यंत मी १०४ कसोटी सामने खेळलो होतो. १५०-१६० कसोटी सामने खेळून माझ्या खात्यात १२ ते १३ धावा हव्या होत्या," असे  त्याने यावेळी बोलून दाखवले.

IPL Unique Record : किंग कोहलीनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम; जाणून घ्या सविस्तर

IPL खेळण्यासाठी आपल्या क्रिकेट बोर्डासोबत घेतला पंगा

पीटरसनने आपल्या कसोटी कारकिर्दीत ४७.२८ च्या सरासरीने ८१८१ धावा केल्या, ज्यात २३ शतके आणि ३५अर्धशतकांचा समावेश आहे. IPL खेळण्याच्या त्याच्या निर्णयामुळे इंग्लंडच्या बांधिलकीशी संघर्ष निर्माण झाला आणि हा विषय इंग्लिश क्रिकेटमधील मोठा वाद ठरला. पण माझा निर्णय पुढच्या पिढीचा मार्ग मोकळा करण्याच्या कामी आला, असेही त्याने सांगितले. जोस बटलरसोबतच्या मुलाखतीचा  मुला

पुढील पिढ्यांसाठी मार्ग झाला मोकळा

IPL मध्ये खेळण्याच्या ठाम भूमिकेमुळे वैयक्तिक नुकसान झाले असले तरी आपली भूमिका नव्या पिढीसाठी सकारात्मक ठरली, याचा आनंदही त्याने व्यक्त केला. माझ्या भूमिकेमुळेच  इंग्लिश खेळाडूंना फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्याची मोकळीक मिळाली आहे. मी काही दिवसांपूर्वी जोस बटलरची मुलाखत घेतली. त्यावेळी त्याने माझे आभार मानले. मी केलेल्या त्यागामुळेच इंग्लिश क्रिकेटर्सला मोठा फायदा झाला. असे बटलने म्हटल्याचा किस्साही पीटरसन याने शेअर केला आहे. २००९ ;च्या हंगामात केवीन पीटरसन याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून IPL मध्ये पदार्पण केले होते. तो आयपीएलमधील महागड्या परदेशी खेळाडूंपैकी एक राहिला आहे.  इंग्लंड अँण्ड वेल्स बोर्डाच्या विरोधात IPL खेळल्यामुळे मोठी किंमत मोजावी लागली, असे तो म्हणाला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : IPL ended my career, but… Kevin Pietersen's big revelation.

Web Summary : Kevin Pietersen claims prioritizing IPL led to disputes with English cricket authorities, costing him his national team spot. He sacrificed his career, but paved the way for future English players in franchise leagues, as acknowledged by Jos Buttler.
टॅग्स :आयपीएल २०२६रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीग