ठळक मुद्देVIVO ने २०१८ मध्ये २१९९ कोटी रुपये खर्च करून आयपीलएची टायटल स्पॉन्सरशिप पाच वर्षांसाठी खरेदी केलेतभारत-चीन सीमेवर झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद
लडाखमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी आणि परवा गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवानांना आलेले वीरमरण यामुळे सध्या भारत आणि चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे .देशातील सर्व स्तरांमधून चीनचा निषेध करून चीन आणि चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) त्यांच्या चिनी प्रायोजकांवर बहिष्कार घालतील का, हा मुद्दा सध्या चर्चिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) गव्हर्निंग काऊंसिलने तातडीची बैठक बोलावली आहे. त्यात चिनी स्पॉन्सर्सबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
चिनी मोबाईल कंपनी VIVO हे आयपीएलचे स्पॉन्सर आहेत आणि 2022पर्यंत त्यांनी 440 कोटींचा करार केला आहे. पण, दोन दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) खजिनदार अरुण धुमाल यांनी करार मोडता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण, चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या वाढत्या मागणीमुळे आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलनं पुढील आठवड्यात तातडीची बैठक बोलावली आहे.
आयपीएलनं ट्विट केलं की,''भारत-चीन सीमेवर झालेल्या झटापटीत आपले जवान शहीद झाले. त्या पार्श्वभूमीवर आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलनं पुढील आठवड्यात विविध स्पॉन्सरशीपच्या कराराचे पुनरावलोकन करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक बोलावली आहे.''
धुमाल यांनी यापूर्वी सांगितले होते की,''बीसीसीआय ही सरकारला आपल्या उत्पन्नामधील एकूण ४० टक्के रक्कम कर म्हणून देते. त्याचा उपयोग देश आणि देशवासियांनाच्या हितांसाठी केला जातो.'' चिनी स्मार्टफोन कंपनी असलेल्या VIVO ने २०१८ मध्ये २१९९ कोटी रुपये खर्च करून आयपीलएची टायटल स्पॉन्सरशिप पाच वर्षांसाठी खरेदी केली होती. धुमाल यांनी पुढे सांगितले की,''इथे भावनिक होऊन विचार करता येणार नाही. चायनीस कंपनींना त्यांच्या देशासाठी मदत करणे किंवा चायनीस कंपनीच्या माध्यामातून भारताला मदत करणे, यातला फरक समजून घेतला पाहिजे.''