Did You Know IPL First Contract Send To Brian Lara By BCCI, But... आयपीएल आज बीसीसीआयसाठी सोन्याचं अंडे देणारी कोंबडी ठरली आहे. २००८ पासून खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेनं भारतीय क्रिकेटला एका विशेष उंचीवर नेले आहे. या स्पर्धेतील लिलावात अनेक क्रिकेटर्सं एका रात्रीत 'करोडपती' झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पण तुम्हाला माहित आहे का? IPL मध्ये खेळण्यासाठी BCCI नं पहिली ऑफर कुणाला दिली होती? तो चेहरा दुसरा तिसरा कोणी नसून तो होता क्रिकेट जगतातील पहिला ब्रँड आणि वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा. पण लारानं बीसीसीआयसमोर एक अट ठेवली अन् त्याची आयपीएल कारकिर्द सुरु होण्याआधीच संपली. क्रिकेट जगतात दबदबा दाखवून देणाऱ्या महान फलंदाजासोबत नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
परदेशी खेळाडूंना IPL शी जोडण्याचं चॅलेंज! BCCI नं असा आखला होता प्लॅन
२००८ मध्ये पहिली वहिली आयपीएल स्पर्धा सुरु झाली त्यावेळी बीसीसीआयसमोर जगभरातील स्टार क्रिकेटर्संना या स्पर्धेत सहभागी करुन घेण्याचं मोठं आव्हान होते. IPL लॉन्च करताना ब्रँड व्हॅल्यू झिरो असलेल्या स्पर्धेत क्रिकेट जगतातील हिरोंना खेळवण्यासाठी बीसीसीआयने एक खास प्लॅन आखला. परदेशी खेळाडूंसाठी ५ हजार ते ४ लाख डॉलर अशी सॅलरी कॅप निश्चित करण्यात आली होती. याचा अर्थ लिलावात मोठी बोली लागली नाही तर परदेशी खेळाडूंना कमाईची हमी देण्यात आली. बीसीसीआयने लारासमोर हाच प्रस्ताव ठेवला. पण कॅरेबियन स्टारनं एक अट ठेवली अन् डील फिस्कटली.
IPL फ्रँचायझी संघ RR चा विक्रमी सौदा! शेन वॉर्नच्या ‘त्या’ मास्टर डीलमुळे कुटुंबाला ४६० कोटींचा फायदा; जाणू...
BCCI नं लाराला दिली होती ४ लाख डॉलरची ऑफर, पण...
BCCI नं IPL च्या पहिल्या वहिल्या हंगामासाठी ऑस्ट्रेलियन ॲडम गिलख्रिस्ट, अँड्रयू सायमंड्स, शेन वॉर्न यासारख्या परदेशी खेळाडूंसोबत लारालाही ४ लाख अमेरिकन डॉलरच्या सॅलरी कॅपमध्ये ठेवण्याची तयारी दर्शवली होती. पण लाराची डिमांड मोठी होती. त्याने IPL स्पर्धेत खेळण्यासाठी किमान १ मिलियन डॉलरची अट ठेवली. ही रक्कम बीसीसीआयने दिलेल्या ऑफरच्या दुप्पट नव्हे तर अडीच पट अधिक होती. अधिक कमाईच्या नादात लारानं IPL स्पर्धेत खेळणारा पहिला खेळाडू होण्याची संधी गमावली. तो मेंटॉर आणि प्रशिक्षकाच्या रुपात IPL शी कनेक्ट झाला, पण खेळाडूच्या रुपात या स्पर्धेत तो कधीच खेळू शकला नाही.