IPL Final, CSK vs KKR, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचा हा चेन्नईकडून अखेरचा सामना?, जाहीर करणार निवृत्ती?; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

चेन्नई सुपर किंग्स आज ९व्यांदा आयपीएल फायनल खेळणार आहे आणि त्यांच्यासमोर कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान आहे. ही धोनीची आयपीएलमधील अखेरची मॅच असल्याची चर्चा सुरू झाली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 05:28 PM2021-10-15T17:28:40+5:302021-10-15T17:29:10+5:30

whatsapp join usJoin us
IPL Final, CSK vs KKR : Is MS Dhoni playing his last match for CSK tonight? Can he announce retirement? Check details | IPL Final, CSK vs KKR, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचा हा चेन्नईकडून अखेरचा सामना?, जाहीर करणार निवृत्ती?; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

IPL Final, CSK vs KKR, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचा हा चेन्नईकडून अखेरचा सामना?, जाहीर करणार निवृत्ती?; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL Final, CSK vs KKR : Is MS Dhoni playing his last match for CSK tonight? - चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आज ९व्यांदा आयपीएल फायनल खेळणार आहे आणि त्यांच्यासमोर कोलकाता नाइट रायडर्सचे ( Kolkata Knight Riders ) आव्हान आहे. ही धोनीची आयपीएलमधील अखेरची मॅच असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आयपीएल २०२०च्या अखेरच्या साखळी सामन्यातही तशी चर्चा रंगली होती, परंतु  तेव्हा त्यानं Definitely Not असं उत्तर दिलं होतं. यावेळी त्याचं उत्तर काही वेगळं होतं आणि त्यामुळे हा आजचा सामना धोनीचा CSKकडून अखेरचा असेल का, अशी चर्चा सुरू आहे. तो यापुढे CSK चा मेंटॉर म्हणून काम पाहणार असल्याचे बोलले जात आहे.

धोनीनं नुकतंच सांगितलं होतं की,''तुम्ही मला पिवळ्या जर्सीतच पाहाल, परंतु मला CSKकडून खेळताना पाहाल की नाही, हे मलाही माहीत नाही. पुढील पर्वात दोन नवीन संघ येणार आहेत आणि त्यामुळे अनेक अनिश्चितता आहेत. रिटेशन पॉलिसी काय आहे, तेही माहीत नाही. त्यामुळे किती परदेशी आणि किती भारतीय खेळाडू आम्ही संघात कायम राखू शकतो,  प्रत्येक खेळाडूसाठी असलेली मनी कॅप हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. जोपर्यंत नियम जाहीर होत नाहीत, तोपर्यंत सर्व अनिश्चितच आहे. त्यामुळे वाट बघण्याशिवाय आपल्याकडे काहीच नाही.''

महेंद्रसिंग धोनीनं ( Dhoni’s last match for CSK?) मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तो टीम इंडियाचा मेंटॉर असणार आहे. आगामी आयपीएलमध्येही धोनी CSKच्या ताफ्यात याच भूमिकेत दिसू शकतो. CSKचा माजी खेळाडू शेन वॉटसन यानंही हिच शक्यता व्यक्त केली आहे. तो म्हणाला, मागच्या वर्षी धोनीनं जे उत्तर दिलं होतं, त्यापेक्षा वेगळं उत्तर यावेळी दिली. IPL 2020मध्ये पुढील पर्वात खेळेल असा विश्वास त्याला होता. पण, यावेळी त्याचे उत्तर बुचकळ्यात टाकणारे आहे. पाहूयात लिलावात काय होतं ते. तो चेन्नईची साथ सोडणार नाही, परंतु खेळाडू म्हणून की मेंटॉर हे अद्याप निश्चित झालेलं नाही.

आकाश चोप्रा यानंही धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांवर मत मांडले. ''चेन्नई धोनीला रिटेन करतील हे पक्कं आहे. CSK म्हणजे MSD... त्यामुळे पुढे खेळायचं की नाही, हे धोनीच्या तंदुरुस्तीवर अवलंबून आहे. पुढील सहा महिन्यांत आयपीएल होणार आहे आणि जर धोनीची खेळायची इच्छा असेल, तर तो नक्की खेळेल. पण, पुढील वर्षी ऑक्शन होणार आहे आणि पुढील तीन वर्षांसाठी एका खेळाडूवर कोट्यवधी रुपये गुंतवले जातील. तसे असल्यात संघात कायम राहून तो चांगली टीम बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. असा विचार त्यानं केल्यास तो CSKसोबत मेंटॉर म्हणून काम करेल.''
  

Web Title: IPL Final, CSK vs KKR : Is MS Dhoni playing his last match for CSK tonight? Can he announce retirement? Check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.