Gujarat Titans Qualify For The Playoffs Along With RCB And Punjab Kings : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील ६० सामन्यानंतर गुजरात टायटन्सच्या विजयासह एकाच वेळी तीन संघांना प्लेऑफ्सचं तिकीट मिळाले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना लोकेश राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सच्या संघासमोर २०० धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना गुजरातकडून साई सुदर्शन याने शतकी खेळी केली. याशिवाय शुबमन गिलच्या भात्यातूनही नाबाद ९३ धावांची खेळी पाहायला मिळाली. गुजरातच्या संघाने १० विकेट्स राखून २०० धावा करत दिमाखदार विजयासह प्लेऑफ्सच तिकीट पक्के केले. पण त्यांनी मिळवलेल्या या विजयास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्जचा संघही प्लेऑफ्ससाठी पात्र ठरला आहे. आता उरलेल्या एका जागेसाठी ३ संघांमध्ये फाईट पाहायला मिळणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चार संघ आधीच आउट; गुजरातसह एकाच वेळी तीन संघ प्लेऑफ्ससाठी पात्र
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे चार संघ आधीच स्पर्धेतून आउट झाले आहेत. प्लेऑफ्सच्या चार जागांसाठी सहा संघ शर्यतीत होते. गुजरात टायटन्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत स्वत:सह आणखी दोन संघाचा प्लेऑफ्सचा मार्ग खुला केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांचेही प्लेऑफ्समधील स्थान पक्के झाले. आता उर्वरित एका जागेसाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात रंगत पाहायला मिळणार आहे.
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
गुजरातचा संघ टॉपला; रनरेटच्या जोरावर बंगळुरु पंजाबच्या एक पाऊल पुढे
दिल्ली कॅपिटल्सचा संघ १२ सामन्यातील ९ विजयासह १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. उर्वरित दोन्ही सामने जिंकून २२ गुणांसह ते या स्थानावर कायम राहण्यासाठी प्रयत्नशील असतील. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज दोन्ही संघ प्रत्येकी १७-१७ गुणांसह प्लेऑफ्ससाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित दोन्ही सामने जिंकून त्यांनाही २१ गुणांसह पहिल्या दोनपर्यंत पोहचण्याची संधी आहे.