Join us

IPL CSK vs HRS: आयपीएलचा थरार, चेन्नईने टॉस जिंकला, धोनीचा संघ मैदानात

पायाच्या दुखापतीमुळे गेल्या तीन सामन्यांना CSK चा एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा खेळाडू मुकला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 19:23 IST

Open in App

चेन्नई - IPL स्पर्धेतील काही सामने होऊन गेल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आज हैदराबाद सनरायर्सविरुद्ध मैदानात उतरली आहे. महेंद्रसिंह धोनीची चेन्नई सुपर किंग्ज (CSK) शुक्रवारी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध आयपीएल सामना खेळत आहे. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्वात धमाकेदार खेळाडूची एन्ट्री होण्याची शक्यता होती. मात्र, आजही बेन स्टोकला विश्रांतीच देण्यात आली आहे. 

पायाच्या दुखापतीमुळे गेल्या तीन सामन्यांना CSK चा एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा खेळाडू मुकला होता. अखेर आता बेन स्टोक्स तंदुरुस्त झाला आहे. पण, आजच्याही सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली आहे. आजच्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वा संघ मैदानात उतरला आहे. कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे, सनरायजर्स हैदराबादचे फलंदाज फटकेबाजी करण्यासाठी मैदानात उतरत आहेत. 

दरम्यान, आजपर्यंतच्या आयपीएल सामन्यात चेन्नई विरुद्ध सनरायजर्स हैदराबादचे एकूण १९ सामने झाले आहेत. त्यापैकी, चेन्नईने १४ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे, धोनीच्या संघाचं पारडं जड मानलं जात आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App