Join us

IPL 2022 : आयपीएल म्हणजे बेटींग, फिक्सिंग साठीचे मार्केट; पाकिस्तानी पत्रकाराचे CSKचं नाव घेत गंभीर आरोप, भारतीयांनी दाखवला आरसा 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) अध्यक्ष रमीझ राजा पाकिस्तान सुपर लीगच्या ( PSL) माध्यमातून इंडियन प्रीमिअर लीगला ( IPL ) टक्कर देण्याच्या तयारीत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 15:36 IST

Open in App

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) अध्यक्ष रमीझ राजा पाकिस्तान सुपर लीगच्या ( PSL) माध्यमातून इंडियन प्रीमिअर लीगला ( IPL ) टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. आयपीएलच्या धर्तीवर PSL मध्येही ऑक्शन पद्धत आणण्याचा प्रयत्न असून त्यानंतर परदेशी खेळाडू कसे आयपीएलमध्ये खेळतात, हेच पाहतो, असा दावा राजा यांनी केला. आयपीएल ही जगातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० लीग असल्याचे संपूर्ण जग मान्य करत असताना पाकिस्तानला हे सत्य पचवणे अवघड जात आहे. त्यात आयपीएल २०२२च्या तोंडवर पाकिस्तानी पत्रकाराने गंभीर आरोप करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

रमीझ राजा म्हणाले होते की,''हा पैशांचा खेळ आहे. पाकिस्तानची क्रिकेट अर्थव्यवस्था वाढली, तर आमचा आदरही वाढेल. सध्यातरी त्यासाठी PSLहाच एक सोर्स आमच्याकडे आहे. जर आम्ही PSLमध्ये ऑक्शन सुरू केले आणि फ्रँचायझींच्या पर्स मर्यादा वाढवली, तर आम्ही IPLला टक्कर देऊ शकतो. मग बघतो की PSL सोडून कोण IPL खेळायला जातं.''  पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळाडूंसाठी ड्राफ्ट तयार केले जाते आणि त्यात स्थानिक खेळाडूंसह परदेशी खेळाडूंचाही समावेश असतो आणि विविध फ्रँचायझी खेळाडूंची निवड करते. या ड्राफ्टनुसार खेळाडूंची पाच गटांत विभागणी केलेली आहे. त्यानुसारच खेळाडूंना पाच प्रकारचे करार दिले जातात.

पाकिस्तानी पत्रकाराचं ट्विट व्हायरलअर्फा फिरोझ झाके असे या पत्रकाराचे नाव आहे. त्याने ट्विट केले की, आयपीएल मार्केट उपलब्ध करून देतो, पण कोणासाठी? बेटींग?, मॅच फिक्सिंग?, स्पॉट फिक्सिंग? असं मार्केट जेथे क्रिकेटपटूंवर फिक्सिंग प्रकरणी निलंबनाची कारवाई होते. असं मार्केट जेथे चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्सवर फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याप्रकरणी दोन वर्षांची बंदी घातली जाते. नेटिझन्सनी घेतली शाळा...  

टॅग्स :आयपीएल २०२२पाकिस्तान
Open in App