Join us

आयपीएलचे कमिशनर होतायत ट्विटरवर ट्रोल, मोहम्मद कैफने दिलं ' हे ' चॅलेंज

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने एक चॅलेंज दिलं आहे. हे चॅलेंज दिल्यानंतर शुक्ला ट्विटरवर ट्रोल होताना दिसत आहेत. नेमकं हे काय आहे चॅलेंज ते आपण पाहूया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 17:22 IST

Open in App
ठळक मुद्देएका व्यक्तीने तर " शुक्ला हे फिटनेस म्हणून समोसे खातात, " अशी खिल्ली उडवली आहे.

नवी दिल्ली : आयपीएल संपलं, पण तरीही आयपीएलचे कमिशनर राजीव शुक्ला सध्याच्या घडीला ट्रेडींगमध्ये आहेत. कारण त्यांना भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने एक चॅलेंज दिलं आहे. हे चॅलेंज दिल्यानंतर शुक्ला ट्विटरवर ट्रोल होताना दिसत आहेत. नेमकं हे काय आहे चॅलेंज ते आपण पाहूया...

काही दिवसांपासून सोशल मीडियावर ' हम फिट तो इंडिया फिट ' असे एक चॅलेंज सुरु आहे. हे चॅलेंज केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी भारताच कर्णधार विराट कोहली, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॉलीवूडचा स्टार ऋतिक रोशन यांना दिले होते. त्यानंतर कोहलीने हे चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदी, महेंद्रसिंग धोनी आणि आपली पत्नी अनुष्का शर्मा यांना दिले होते.

कैफने जिममध्ये एक पायांचा व्यायामप्रकार केला आहे आणि हे चॅलेंज त्याने आयपीएलचे कमिशनर शुक्ला यांना दिले आहे. यावर लोकांनी शुक्ला यांना ट्रोल केले आहे. एका व्यक्तीने तर " शुक्ला हे फिटनेस म्हणून समोसे खातात, " अशी खिल्ली उडवली आहे. एका व्यक्तीने तर, शुक्ला आणि फिटनेस यांचा काही संबंध आहे का? " अशी खोचक टीकाही केली आहे.

टॅग्स :क्रिकेट