Join us

IPL चे मीडिया राईट्स 4 लाख कोटींना विकले जाणार; अध्यक्ष अरुण धुमल यांचे मोठे वक्तव्य

आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी आयपीएलच्या मीडिया राईट्सबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 18:34 IST

Open in App

IPL: आयपीेलची सुरुवात झाल्यापासून दरवर्षी याची व्याप्ती वाढत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यात IPL ची सुरू होणार आहे. भारतात आयपीएलची सुरुवात झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये याची प्रचंड क्रेझ आहे. याच क्रेझमुळे आयपीएलचे सॅटेलाईट राईट्स, ओटीटी राईट्स कोट्यवधी रुपयांमध्ये विकले जातात. दरम्यान, आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल म्हणाले की, येत्या 20 वर्षांत आयपीएलचे मीडिया राईट्स 700 टक्क्यांहून अधिक वाढण्याची अपेक्षा आहे.

बंगळुरुमध्ये आयोजित RCB Innovation Lab's Leaders Meet कार्यक्रमात बोलताना धुमल म्हणातात की, आगामी काळात आयपीएलचे मीडिया राईट्स 50 अब्ज डॉलर्स (4 लाख कोटींहून अधिक) पोहोचू शकतात. सध्या हा आकडा सुमारे 6.2 अब्ज डॉलर (48000 कोटी रुपये) आहे. गेल्या 15 वर्षांचा विचार केला, तर आगामी काळात(2043 पर्यंत) आयपीएलचे मीडिया अधिकार सुमारे $50 अब्ज असतील, असा आमचा अंदाज आहे. 

यामध्ये अधिक चांगले करण्याचा आमचा प्रयत्न राहील. चाहत्यांना जे आवडेल, त्यानुसार आम्ही काम करू. क्रिकेट आता ऑलिम्पिकचाही एक भाग बनत आहे. महिला प्रीमियर लीग महिला क्रिकेटला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जात आहेत. सध्या आयपीएल ही दुसरी सर्वात महागडी लीग आहे. नॅशनल फुटबॉल लीग पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याचे मीडिया अधिकार सुमारे 110 अब्ज डॉलर्स आहेत. व्यक्तिशः मला वाटते की आयपीएल हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वोत्तम मेक इन इंडिया ब्रँड आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :आयपीएल २०२३आयपीएल लिलावऑफ द फिल्डजय शाहबीसीसीआय