Join us

IPL BETTING : सलमान खानचा भाऊ अरबाज मॅच फिक्संगमध्ये फसला; पोलिसांनी पाठवले समन्स

सलमान खानचा भाऊ अरबाज खानला आयपीएलमध्ये सट्टेबाजी केल्याप्रकरणी ठाणे क्राईम ब्रांचने समन्स बजावले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 16:09 IST

Open in App
ठळक मुद्देसट्टेबाज सोनू जालनशी अरबाजचे संबंध असल्याचे पोलिसांनी याप्रकरणी सांगितले आहे.

मुंबई : सलमान खानचा भाऊ अरबाजला आयपीएलमध्ये सट्टेबाजी केल्याप्रकरणी ठाणे क्राईम ब्रांचने समन्स बजावले आहेत. सट्टेबाज सोनू जालनशी अरबाजचे संबंध असल्याचे पोलिसांनी याप्रकरणी सांगितले आहे.

 

अरबाजने सोनू या सट्टेबाजाला पैसे देत मोठा डाव खेळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०१२ साली जेव्हा सट्टेबाजीबाबत कारवाई करण्यात आली होती, तेव्हा सोनू जालान उर्फ सोनू मालाडलाही पोलिसांनी पकडले होते. शुक्रवारी ठाण्याच्या क्राईम ब्रांचने अराबाजला समन्स धाडले असून त्याला पोलिसांपुढे शनिवारी हजर राहावे लागणार आहे.

टॅग्स :अरबाज खानआयपीएलक्रिकेटक्रिकेट सट्टेबाजी