आयपीएल ही जगातील सर्वोत्तम क्रिकेट लीग आहे. या स्पर्धेला हलक्यात घेणाऱ्यांना IPL च्या लिलावात घेऊच नका, अशा शब्दांत लिटल मास्टर सुनील गावसकरांनी मिनी लिलावाधी नखरे करणाऱ्या परदेशी खेळाडूंना सुनावले आहे. जो खेळाडू आयपीएल स्पर्धेला मान-सन्मान देत नसेल, तर लिलावात त्याच्यावर एक सेकंदही वाया घालवू नये, असे मत गावसरांनी व्यक्त केले आहे. IPL २०२६ च्या हंगामाआधी होणाऱ्या मिनी लिलावाआधी काही परदेशी खेळाडूंनी मोजक्या सामन्यात उपलब्ध राहणार असल्याची माहिती बीसीसीआयला दिली आहे. याच मुद्द्यावरून गावसकरांनी आपले मत मांडले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...तर अशा खेळाडूंवर एक सेकंदही वाया घालवू नका!
मिड-डेसाठी लिहिलेल्या स्तंभलेखातून गावसकरांनी IPL स्पर्धेसाठी मोजक्या सामन्यात उपलब्ध राहण्याची परवानगी मागणाऱ्या परदेशी खेळाडूंची शाळा घेतली आहे. गावसकर म्हणाले आहेत की, "काही खेळाडूंनी स्वतःला मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध केले आहे. स्पष्ट सांगायचे तर, जो खेळाडू आयपीएलला मान देत नाही आणि स्वतःला संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध करत नाही, त्याला लिलावात असण्याचा हक्कच नाही. राष्ट्रीय बांधिलकीशिवाय अन्य दुसऱ्या एखाद्या गोष्टीला खेळाडू महत्त्व देत असतील तर अशा खेळाडूंवर लिलावात एक सेकंदही वाया घालवू नये."
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केलं 'रजिस्ट्रेशन'
कोट्यवधीच्या बेस प्राइजसह IPL लिलावासाठी नाव नोंदणी, पण...
काही परदेशी खेळाडूंनी कोट्यवधीच्या बेस प्राइजसह मिनी लिलावासाठी नाव नोंदणी केली आहे. पण बोली लागण्याआधी आपण मोजक्या सामन्यासाठी उपलब्ध असेन, अशी माहिती बीसीसीआयला कळवली आहे. यात २ कोटी बेस प्राइजच्या कॅटगरीतील ऑस्ट्रेलियाचा जॉश इंग्लिसशिवाय अॅश्टन एगर विल सदरलँड, न्यूझीलंडचा अॅडम मिल्ने आणि दक्षिण आफ्रिकेच्या रायली रोसोचा समावेश आहे.
सलग तिसऱ्या वर्षी परदेशात पार पडणार IPL चा लिलाव
आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाआधी १६ डिसेंबरला अबू धाबी येथे मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. २०२३ आणि २०२४ नंतर सलग तिसऱ्यांदा IPL लिलावासाठी परदेशातील ठिकाण पक्के करण्यात आले आहे. गत हंगामात पंजाब किंग्जच्या ताफ्यातून दमदार कामगिरी करणारा जोश इंग्लिस लग्न बंधणात अडकणार असल्यामुळे तो संपूर्ण स्पर्धा खेळणार नाही. त्यामुळे त्याच्यासह अन्य खेळाडूंवर मोठी किंमत देऊन संघात सामील करण्याची हिंमत IPL फ्रँचायझी संघ मालक दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.