Jaydev Unadkat creates history, IPL Auction 2025 Live: आगामी हंगामासाठी सुरु असलेल्या मेगालिलावात पहिल्या दिवशी एकूण ७२ खेळाडूंवर बोली लावण्यात आली. या खेळाडूंसाठी ४६७ कोटींची उलाढाल झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा लिलाव आज सुरु झाला. आजच्या दिवसात आपल्या संघातील एकूण खेळाडूंचा स्लॉट पूर्ण करण्याच्या दिशेने सर्वच संघांची धावपळ दिसून आली. पण या धावपळीत एका भारतीय खेळाडूने अनोखा विक्रम केला. मध्यमगती डावखुरा गोलंदाज जयदेव उनाडकट १ कोटींच्या मूळ किमतीवर लिलावात आला. त्याला सनरायजर्स हैदराबादच्या संघाने त्याच मूळ किमतीवर आपल्या संघात घेतले. यासह आयपीएल इतिहासातील ७ लिलावांमध्ये प्रत्येक वेळी बोली लागलेला जयदेव उनाडकट हा एकमेव खेळाडू ठरला.
-----
सनरायझर्स हैदराबाद संघ लिलावात पाच बड्या खेळाडूंसह उतरला. संघाने हेनरीक क्लासेन याला सर्वाधिक २३ कोटी रुपयांच्या रकमेसह संघात कायम ठेवले.ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याला १८ कोटींसह संघात रिटेन केले. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड या दोघांना प्रत्येकी १४ कोटी देऊन संघात कायम ठेवण्यात आले तर उदयोन्मुख भारतीय खेळाडू नितीश रेड्डी याला ६ कोटी रुपयांसह संघाने रिटेन केले.