Join us

IPL Auction 2024 : २१ खेळाडू, १४ परदेशी, १३७.६० कोटींची लागली बोली! ५ तासात कोण झाले मालामाल 

IPL Auction 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी सुरू असलेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स व मिचेल स्टार्क या दोन स्टार खेळाडूंनी जवळपास ४५ कोटी आपल्या खिशात घातले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 17:05 IST

Open in App

IPL Auction 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी सुरू असलेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स व मिचेल स्टार्क या दोन स्टार खेळाडूंनी जवळपास ४५ कोटी आपल्या खिशात घातले.  सनरायझर्स हैदराबादने ऑसी कर्णधार पॅट कमिन्ससाठी २०.५० कोटी रुपये मोजले आणि ८ वर्षानंतर आयपीएलमध्ये परतलेल्या मिचेल स्टार्कसाठी कोलकाता नाइट रायडर्सने २४.७५ कोटी रुपये मोजले. आतापर्यंत ५ तासांत २१ खेळाडूंवर बोली लावली गेली आणि त्यापैकी १४ खेळाडू परदेशी आहेत. या सर्वांसाठी १३७.६० कोटी खर्च केले गेले आहेत. 

IPL 2024 Auction मधील महागडे खेळाडू

  • मिचेल स्टार्क ( कोलकाता नाइट रायडर्स ) - २४.७५ कोटी
  • पॅट कमिन्स ( सनरायझर्स हैदराबाद ) - २०.५० कोटी
  • डॅरिल मिचेल ( चेन्नई सुपर किंग्स ) - १४ कोटी
  • हर्षल पटेल ( पंजाब किंग्स ) - ११.७५ कोटी
  • अल्झारी जोसेफ ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ) - ११.५० कोटी
  • रोव्हमन पॉवेल ( राजस्थान रॉयल्स) - ७.४० कोटी
  • ट्रॅव्हिस हेड ( सनरायझर्स हैदराबाद ) - ६.८० कोटी
  • शिवम मावी ( लखनौ सुपर जायंट्स ) - ६.४० कोटी
  • उमेश यादव ( गुजरात टायटन्स) - ५.८० कोटी
  • गेराल्ड कोएत्झी ( मुंबई इंडियन्स ) - ५ कोटी

 

  • अनसोल्ड खेळाडू - रिली रोसोवू, स्टीव्ह स्मिथ, जोश इंग्लिस, ल्युकी फर्ग्युसन, जोश हेझलवूड, मुजीब रहमान, आदील राशीद, फिल सॉल्ट, इश सोढी, करुण नायर, मनीष पांडे, कुशल मेंडिस, अकिल होसैन, तब्रेझ शम्सी.

 

कोणाच्या खात्यात किती रक्कम शिल्लक

  • चेन्नई सुपर किंग्स - ११.६० कोटी 
  • दिल्ली कॅपिटल्स - २४.४५ कोटी
  • मुंबई इंडियन्स - ८.१५ कोटी
  • पंजाब किंग्स - १३.१५ कोटी
  • सनरायझर्स हैदराबाद - ३.६० कोटी
  • लखनौ सुपर जायंट्स - ६.७५ कोटी
  • गुजरात टायटन्स - ३१.८५ कोटी
  • कोलकाता नाइट रायडर्स - ६.९५ कोटी
  • राजस्थान रॉयल्स - ७.१० कोटी
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ११.७५ कोटी 
टॅग्स :आयपीएल लिलावसनरायझर्स हैदराबाद