IPL Auction 2023 Live : 'Tie-break' नियम हंगामा माजवणार! फ्रँयाचझीचा फायदा, पण खेळाडूंचा तोटा करणार

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२३ ) १६वं सीझन यावेळी भारतात होणार आहे. पण, त्याआधी IPL 2023 मिनी ऑक्शन (IPL Auction 2023) आज होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 01:57 PM2022-12-23T13:57:31+5:302022-12-23T14:01:42+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2023 Live : All you need to know about the new Tie-break rule | IPL Auction 2023 Live : 'Tie-break' नियम हंगामा माजवणार! फ्रँयाचझीचा फायदा, पण खेळाडूंचा तोटा करणार

IPL Auction 2023 Live : 'Tie-break' नियम हंगामा माजवणार! फ्रँयाचझीचा फायदा, पण खेळाडूंचा तोटा करणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२३ ) १६वं सीझन यावेळी भारतात होणार आहे. पण, त्याआधी IPL 2023 मिनी ऑक्शन (IPL Auction 2023) आज होणार आहे. हा लिलाव कोचीमध्ये सुरू होणार आहे. गेल्या मोसमात कोरोनामुळे सामने यूएईला हलवण्यात आले होते. अशा परिस्थितीत, यावेळी एकूण १० संघ ४०५ खेळाडूंवर बोली लावतील, ज्यात ८७ स्लॉट आहेत. प्रत्येक संघाला खेळाडू खरेदी करण्यासाठी काही नियम पाळावे लागतात. यापैकी एका नियमाचे नाव आहे सायलेंट टाय ब्रेक ( Tie-break rule) नियम. फ्रँचायझी हा नियम फार क्वचितच वापरतात. अशा स्थितीत हा नियम कधी लागू होतो आणि त्याचा फायदा फ्रँचायझींना कसा होतो, तर खेळाडूंसाठी तोट्याचा सौदा आहे. चला सर्व काही जाणून घेऊया.

- २७३ भारतीय व १३२ परदेशी खेळाडूंचा समावेश 
- ११९ खेळाडू हे राष्ट्रीय संघांकडून खेळलेले आणि २८२ पदार्पणाची संधी मिळालेले खेळाडू 
- ४०५  खेळाडूंपैकी केवळ ८७ खेळाडूंनाच संधी मिळणार 
- आयपीएल फ्रँचायझींनी आतापर्यंत ७४३.५ कोटी रुपये लिलावात खर्च केले आहेत 
- आज २०६.५ कोटी ८६ खेळाडूंसाठी खर्च होणे अपेक्षित आहेत. 

टायब्रेकरचा नियम काय आहे?
टायब्रेकरचा नियम २०१० मध्ये पहिल्यांदा वापरण्यात आला होता. १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा हा नियम आयपीएल २०२३ मिनी लिलावात पुनरागमन करत आहे. या नियमानुसार, दोन्ही संघांना त्यांच्या पर्समधील सर्व पैसे संपेपर्यंत खेळाडू विकत घेण्यासाठी बोली लावावी लागते. यानंतर, टाय ब्रेकरचा नियम वापरला जातो. या नियमानुसार, ज्या खेळाडूसाठी दोन्ही फ्रँचायझी बोली लावतात आणि त्यांचे पैसे संपल्यावर बोली समान राहिल्यास. एका कागदावर लिहून बोली लावली जाते. याला गुप्त बोली म्हणतात. यानंतर, खेळाडू लिखित स्वरूपात सर्वाधिक बोली लावलेल्या फ्रँचायझीच्या संघाकडे जातो.

खेळाडूला फायदा मिळत नाही
याचा फायदा फ्रँचायझीला होतो, पण तो खेळाडूसाठी तोट्याचा सौदा ठरतो. कारण त्यावेळी खेळाडूला जेवढे पैसे फ्रँचायझीच्या पर्समध्ये असतात तेवढेच मिळतात. म्हणजेच उर्वरित पैसा बीसीसीआयकडे जातो.  दोन्ही फ्रँचायझींच्या गुप्त बोलीप्रमाणे टायब्रेकर राहिल्यास, त्यानंतरही हा नियम पुन्हा लागू केला जातो.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IPL Auction 2023 Live : All you need to know about the new Tie-break rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.