Indian Premier League Players Mega Auction 2022 : चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super kings) रिलीज केल्यानंतर सुरेश रैनाला ( Suresh Raina) कोणता संघ ताफ्यात घेणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. आयपीएलच्या २०२० पर्वात रैना आणि CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या वादाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, त्यावर रैनानं मौन सोडताना अफवा असल्याचे सांगितले. त्यानंतर CSKने आयपीएल २०२२साठी रैनाला रिलीज केले. पण, २ कोटी मुळ किंमत असलेल्या रैनासाठी कोणत्याच फ्रँचायझीने बोली लावली नाही. IPL Auction 2022 Live Updates
सुरेश रैना व धोनी यांची घट्ट मैत्रीही जगाने पाहिली आहे. धोनीने २०२०मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला तेव्हा लगेचच रैनाने निवृत्ती जाहीर केली होती. टी-२०, वन डे आणि कसोटी अशा तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा भारताचा पहिला फलंदाज असलेल्या रैनाला २०२१च्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरीही करता आली नाही. रैनाने १२ सामन्यांत १६० धावाच केल्या होत्या. एकूण आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत ३२.५१च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २५ विकेट्सही घेतल्या आहेत. रैनाने ५०६ चौकार व २०३ षटकार खेचले आहेत आणि १०८ झेलही टिपले आहेत.
तेच दुसरीकडे
चेन्नई सुपर किंग्सने ड्वेन ब्राव्होसाठी ४.४० कोटी रुपये मोजले. ब्राव्हो CSKचा हुकमी खेळाडू आहे आणि त्याने १५१ सामन्यांत १५३७ धावा केल्या आहेत व १६७ विकेट्सही आहेत.
फॅफ ड्यू प्लेसिसलाही CSK ने गमावले...
इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) त्यांच्या जुन्याच खेळाडूंसाठी प्रयत्नशील असतील असे संकेत मिळत होते. त्यामुळेच जेव्हा फॅफ ड्यू प्लेसिसचे ( Faf du Plessis) नाव समोर आले तेव्हा सर्वांच्या नजरा CSKच्या टेबलकडे वळल्या, परंतु CSKनं फॅफ साठी बोली लावलीच नाही. RCB ने अनपेक्षित बोली लावताना फॅफला आपल्या ताफ्यात करून घेतले, या मॅचविनर ओपनरसाठी ७ कोटी रुपये मोजले. Faf du Plessis विराट कोहलीच्या संघात गेल्यानंतर CSK ने माजी खेळाडूसाठी भावनिक ट्विट केले..