Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठीच्या मेगा ऑक्शनची प्रतीक्षा संपली आहे. आयपीएल २०२२ ऑक्शनला सुरुवात झाली आहे. ५९० खेळाडूंनी आयपीएल लिलावात नावं नोंदवली आहेत. त्यात २०३ गोलंदाज, १०२ फलंदाज, २२७ अष्टपैलू आणि ५८ यष्टिरक्षकांचा समावेश आहे. त्यात काल १० खेळाडूंची भर पडल्याने आता १० संघ ६०० खेळाडूंवर बोली लावणार आहेत. यापैकी आज ९८ खेळाडूंवर बोली लावली जाईल आणि Marquee खेळाडूंपासून सुरुवात झाली. दोन दिवसांच्या या लिलावात ६०० पैकी २१७ खेळाडूंचे नशीब चमकणार आहे. IPL Auction 2022 Live Updates
कागिसो रबाडासाठी पंजाब किंग्सने ९.२५ कोटी मोजले आणि आता दिल्ली कॅपिटल्सचे हे माजी सहकारी पुन्हा एकत्र खेळताना दिसणार आहेत. पंजाब किंग्सने ८.२५ कोटींत शिखर धवनला आपल्या ताफ्यात घेतले आहे. राजस्थान रॉयल्सने आर अश्विनसाठी ५ कोटी मोजले. कोलकाता नाइट रायडर्सने कमाल केली. २०२० मध्ये सर्वाधिक १५.५० कोटी मोजले होते आणि त्याला पुन्हा त्यांनी आपल्या ताफ्यात घेतले, परंतु निम्म्या किंमतीत... KKRने ७.२५ कोटींत पॅट कमिन्सला पुन्हा ताफ्यात घेतले. कमिन्सने आयपीएलमध्ये ३७ सामन्यांत ३८ विकेट्स घेतल्या आहेत.
शिखर धवन पंजाब किंग्सकडे... सर्वात प्रथम बोली शिखर धवनवर लागली ( Shikhar Dhawan)... सुरूवातीला त्याच्यावर कोणीच बोली लावण्यास तयार नव्हते, परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) शेवटच्या क्षणाला बोली लावण्यास सुरूवात केली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स मैदानावर उतरले... दोन कोटी बेस प्राईज असलेल्या शिखरसाठी पंजाब किंग्सने ८ कोटी २५ लाख रुपये मोजले. मयांक अग्रवालसह तो आता पंजाब किंग्सकडून सलामीला खेळताना दिसेल. शिखर धवनने आयपीएलच्या १९२ सामन्यांत ५७८४ धावा केल्या आहेत. त्याने २ शतकं व ४४ अर्धशतकं झळकावली आहेत.